सीईओ स्वामी यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना सुचना
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी वेबेक्स मीटिंगद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत सर्व गटविकास अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. यावेळी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणा बाबत सविस्तर माहिती दिली.
ग्राम सुरक्षा यंत्रणा कशा पद्धतीने कार्य करते. ही यंत्रणा वापरून नागरिक आपत्कालीन परिस्थितीत कशा पद्धतीने मदत मिळवू शकतात. आजपर्यंत नाशिक, सातारा, पुणे व अहमदनगर या जिल्ह्यात ही यंत्रणा यशस्वी रित्या कार्यान्वित झाली असून कित्येक संभाव्य दरोडे यामुळे टळले असून अनेक दरोडेखोरांना दरोड्याआधीच पकडणे या यंत्रणेमुळे शक्य झाले आहे. त्याचप्रमाणे गतवर्षी नाशिक जिल्ह्यात पुर परिस्थितीत अनेक नागरीकांना वेळेत मदत करणे प्रशासनास शक्य झाले आहे. अशी माहिती सातपुते यांनी यावेळी दिली. त्याचप्रमाणे सीईओ दिलीप स्वामी यांनी सोलापूर जिल्ह्यात ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी पुढाकार घेऊन या व्हिडिओ कॉन्फरन्सचे आयोजन केल्याबद्दल आभार मानले.
या वेबेक्स मिटींगमध्ये प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय राठोड, सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.यावेळी हा लाभ घेण्यासाठी प्रत्येक लाभार्थी रूपये 50 प्रमाणे प्रतिवर्ष शुल्क आकारण्यात येणार आहे सदरचे शुल्क ग्रामनिधी/वित्त आयोग/लोकसहभाग या माध्यमातून हे शुल्क भरून तीन महिन्यांच्या आत जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करा. पहिल्या टप्प्यात छोटी व निधीची अडचण नसणारी गावे तातडीने पुर्ण करा.दुसऱ्या टप्प्यात मोठी व निधीची अडचण असणारी गावे निधीची तरतूद करुन पुर्ण करा.गटविकास अधिकाऱ्यांसह गटशिक्षणाधिकारी यांनी तातडीने सुयोग्य नियोजन करून यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत गावोगावी भेटी द्या. जनजागृती करा अशा सूचना यावेळी सीईओ स्वामी यांनी दिल्या.
या यंत्रणेचा लाभ घेण्यासाठी 18002703600 हा क्रमांक ग्रामस्थांनी आपल्या मोबाईल मध्ये संग्रहित (सेव्ह) करायचा आहे. हा क्रमांक मोबाईल मध्ये सेव्ह करताना मराठी मध्ये “अअअ” अथवा इंग्रजी मध्ये “AAA” या नावाने सेव्ह करावा जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत मोबाईल डिरेक्टरीत सर्वात वर हा नंबर असल्याने शोधायला वेळ लागणार नाही.
ग्राम सुरक्षा यंत्रणेचे नेमके फायदे काय ?
घटनाग्रस्त नागरिकांना परिसरातील नागरिकांची तातडीने मदत मिळते. गावातील कार्यक्रम / घटना बिना विलंब ग्रामस्थांना एकाच वेळी कळतात.
अफवांना आळा घालणे शक्य होते.प्रशासनाला नागरिकांशी जलद संवाद साधता येतो. पोलीस यंत्रणेस कायदा सुव्यवस्था कायम राखणे कामी नागरिकांचे सहकार्य मिळते.
ग्राम सुरक्षा यंत्रणेची वैशिष्ट्ये
- संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा.* गावासाठी यंत्रणा सुरू करणे व सहभागी होण्यासाठी सोपी पध्दत.* संपूर्ण भारतासाठी एकच टोलफ्री नंबर 18002703600. * यंत्रणेत सहभागी असलेला कोणताही नागरिक आपत्ती काळात संपूर्ण परिसराला सावध करूशकतो.* संदेश देणाऱ्या व्यक्तीच्या आवाजातच संदेश कॉल स्वरूपात परिसरातील नागरिकांना मिळतो. * दुर्घटनेचे स्वरूप, तीव्रता, ठिकाण कळल्याने गावकऱ्यांना विना विलंब व नियोजनबध्द मदत करता येते.
- नियमानुसार दिलेले संदेशच स्वयंचलित रित्या प्रसारित होतात.* नियमाबाह्य दिलेले संदेश / अपूर्ण संदेश रद्द होतात व प्रसारित होत नाहीत.
- एका गावात चोरी करून चोर दुसऱ्या गावच्या दिशेने गेल्यास त्या गावालाही सावध करणे शक्य. * वाहन चोरीचा संदेश आजूबाजूच्या १० किमी परिसरातील सर्व दिशांच्या गावांना तत्काळ .
ग्राम सुरक्षा यंत्रणेचा कोणत्या घटनांसाठी वापरू शकतो ?
चोरी, दरोड्याची घटना, गंभीर अपघात निधन वार्ता, आग जळिताची घटना, विषारी सर्पदंश, विषारी साप घरात घुमणे, पिसाळलेला कुत्रा गावात येणे. बिबट्याचा हल्ला, लहान मुल हरविणे, महिलांची छेडछाड, वाहन चोरी, शेतमालाची चोरी, राशन, रॉकेल, यांचे गायात सुरू झालेले वितरण, ग्रामसभा, ग्रामपंचायतच्या योजना सार्वजनिक कार्यक्रम यांची माहिती, गावातील शाळांकडुन दिल्या जाणाऱ्या सुचना, सरकारी कार्यालयांकडुन दिल्या जाणाच्या सुचना, पोलीस यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सुचना इत्यादी .
ग्राम सुरक्षा यंत्रणा गावात सुरू कशी करावी ?
प्रत्येक गावात पोलीसस्टेशन कडून ग्राम सुरक्षा यंत्रणा सुरू करण्यात येत आहे. स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व गावातील सामाजिक कार्यकर्ते यांची ए सभा घेवुन ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रात्यक्षिक देण्यात येते. पंचायत समिती कार्यालयात स्थानिक पोलिस ठ पोलीस निरिक्षक व गट विकास अधिकारी यांचे उपस्थितीत ग्रामविकास अधिकारी/ ग्रामसेवक यांना ग्राम यंत्रणेचे प्रात्यक्षिक देण्यात येते.
या ऑनलाइन सभेचे आभार प्रदर्शन उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी केले.