सोलापूर : सोलापूर शहरात डेंग्यू सदृश्य परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. डेंग्यूमुळे आतापर्यंत 2 मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. शहरात कोरोना पेक्षा डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसते आहे. आपल्या शहरात कोरोनाचे 34 तर डेंग्यूचे 101 रुग्ण उपचार घेत आहेत असे निदर्शनास आले आहे. यामुळे परिस्थिती गंभीर आहे असे लक्षात घेता. दोन मुलांचा मृत्यू झाल्यानंतर महापालिका प्रशासनान व लोकप्रतिनिधींना जाग येते ही बाब गंभीर आहे. असे मत माकप च्या नगरसेविका कॉ. कामिनी आडम यांनी व्यक्त केले.
गुरुवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी डी.वाय.एफ.आय.जिल्हा समितीच्या वतीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नगरसेविका कॉ.कामीनीताई आडम यांच्या नेतृत्वाखाली डेंग्यू चा प्रसार रोखण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करावे.ही प्रमुख मागणी घेऊन सोलापूर महानगरपालिका आयुक्त.पी.शिवशंकर यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले.यावेळी डी.वाय.एफ.आय.चे जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी, जिल्हा सचिव अनिल वासम,राज्य उपाध्यक्ष अशोक बल्ला,सहसचिव दत्ता चव्हाण, शाम आडम,राहुल भैसे, मोहन कोक्कुल आदी उपस्थित होते.
निवेदन असे म्हटले आहे की, डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी, आरोग्य विभाग यांचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे यावरुन लक्षात येते. डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी ज्या उपाय योजना नियोजन अगोदर करायला पाहिजे होते ते झालेलं नाही असे वाटते.यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढतसंख्या आहेत. हा शहरातील नागरिकांच्या जीवाशीखेळ सुरू आहे.
डेंग्यूचा प्रसार साठलेल्या पाण्यातून होतो .सोलापूर शहरात 6, 7 दिवसाला पाणीपुरवठा होतो त्यामुळे लोक जमेल तेवढे पाणी टाक्या ,बॅरल, इत्यादी मध्ये साठवून ठेवतात. त्यासाठवलेल्या पाण्यात डेंग्यूचा जंतू तयार होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे शहराला दररोज पाणी पुरवठा करण्याच आश्वासन फक्त आश्वासनच राहिले याला सर्वस्वी जबाबदार महापालिका आणि लोकप्रतिनिधी आहेत.डेंगू सदृश परिस्थितीची हाताळण्यामध्ये महापालिका आणि आरोग्य विभाग अपयशी ठरली आहे. कोरोनामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असताना आज डेंग्यूमुळे लहान मुलांना मोठ्या प्रमाणात आजारापणास सामोरे जावे लागत आहे. कोरोनाने अनेकांच्या घरातील जवळचे लोक सोडून गेले त्यातून सावरत नाही. तोपर्यंत डेंग्यूने पुन्हा डेंग्यूच्या या भीतीने लोक काळजीत पडले आहेत. आरोग्याचा प्रचंड मोठाभार पडत आहे. या सर्व परिस्थितीत लोकांनी जगायचं कस असा प्रश्न आहे.
तसेच शहरात संथगतीने सुरू असलेल्या स्मार्ट कामामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. स्मार्ट सिटीच्या कामामुळे खोदलेली रस्ते, ड्रेनेज, पाईपलाईन इत्यादीची कामे अपूर्ण आहेत त्यामुळे. जागोजागी खडे पडले आहेत, नाला ड्रेनेज गटारी तुंबलेल्या आहेत. पावसाळ्यात हे तुडुंब भरतात त्यामुळे साचलेल्या पाण्यातून पसरणारे रोगराई त्यामुळे निर्माण होणारे आजार हा देखील चिंतेचा विषय आहे. म्हणून आम्ही मागणी करीत आहोत.
आमच्या मागण्या
१ )शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यात यावी. 2) डेंग्यू सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम उभी करावी.3) जंतुनाशक फवारणी नियमितपणे करण्यात यावी.4) दररोज सर्व भागातील कचरा नियमितपणे गोळा करावे.5) नगरसेवक यांनी आपल्या वॉर्डातील लोकांमध्ये जाणिव जागृती निर्माण करून स्वच्छतेचि काळजी घ्यावी.6) डेंग्यूग्रस्त मयताच्या कुटुंबियांना किमान 10 लाख आर्थिक मदत करावी.