सोलापूर : ३ ऑक्टोबर जागतिक वॉकिंग डे निमित्त द असोसिएशन ऑफ स्पोर्ट्स फॉर अॉल, सोलापूर (तसिफा) ह्या संस्थेच्या वतीने गणपती घाट ते सिध्देश्वर मंदिर परिसरात कोरोना विषयक जनजागृतीपर वॉकिंगचे आयोजन करण्यात आले. तसिफाचे सर्व पदाधिकारी आणि सन्मानिय प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास वंदन करुन नंतर बालचमुंच्या हस्ते गणपती घाटावर भगवान श्री गणेशाचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, सर्व बालचमु यांनी उपस्थित मान्यवरांकडून मशाल स्विकरात इंग्रजी, हिंदी, मराठी, उर्दू, कन्नड, तेलगु, संस्कृत, मारवाडी ह्या भाषेत कोरोना जनजागृतीपर शपथ घेतली. संस्थेचे ब्रीदवाक्य ” एक पाऊल राष्ट्रीय एकात्मतासाठी करोना पासून मुक्ती”हे होते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आरोग्य विषयक निकषानुसार दररोज प्रत्येक व्यक्तीने कीमान १०,००० पावले चालल्यास रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि सर्व आजारांवर मात करता येते. चालणे हा अत्यंत सोप्या पद्धतीचा व्यायामाचाच एक प्रकार असून प्रत्येकाने सात्विक सकस आहारा समवेत आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करावे असे आवाहन द असोसिएशन ऑफ स्पोर्ट्स फॉर अॉल, सोलापूर (तसिफा) ह्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले. जगभरातील ९५ देशात ३ अॉक्टोबर ते ३१ अॉक्टोबर दरम्यान वर्ल्ड वॉकिंग डे उत्साहात साजरा केला जातो, तसिफा ही संस्था जागतिक आरोग्य संघटना, इंडियन अॉलिम्पिक कमिटी यांच्याशी संलग्न असून येणाऱ्या काळात सोलापूरच्या क्रिडा क्षेत्रात भरीव कामगिरी ह्या संस्थेच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती तसिफाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
द असोसिएशन ऑफ स्पोर्ट्स फॉर अॉल, सोलापूर (तसिफा) यांच्या वतीने आयोजित वर्ल्ड वॉकिंग डे निमित्त सोलापूरातील नामांकित संस्था, संघटना आणि विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला. कार्यक्रमात माजी आमदार नरसिंग मेंगजी, क्रिडाधिकारी नजीर शेख, नसिमा पठाण, योगीन गुर्जर, अॅड.प्रमोद शहा, डॉ.सचिन नरोटे, डॉ.अवधूत डांगे,डॉ. रमेश अग्रवाल; चंदू भाई dedhiya;डॉ.अमोल देगावकर, डॉ.शिवानंद हिरेमठ, मल्लिकार्जुन परळकर, आनंद हुलगेरी, रमाकांत साळुंखे;द असोसिएशन ऑफ स्पोर्ट्स फॉर अॉल, सोलापूर (तसिफा) संस्थेचे संस्थापक ट्रस्टी अप्पासाहेब चिंचकर, अध्यक्ष डॉ.प्रमोद कसबे, उपाध्यक्ष विजय कुंदन जाधव, सचिवा संपदा जोशी, खजिनदार प्रकाश चिंचकर, संचालक देवेंद्र अवटी, विजय गायकवाड, वसिम शेख, आरती काशीकर, अर्चना वाघमारे, कल्पना भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.