सोलापूर : येथील नवीन आरटीओ ऑफिस जवळील आदित्य नगर वसाहतीत राहणार्या शामराव दत्तात्रय कुलकर्णी (वय ६४) यांचे गुरुवारी अल्प आजाराने निधन झाले . त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा,एक मुलगी सून व नातवंडे असा परिवार आहे .श्यामराव कुलकर्णी हे महापालिकेत सेवेमध्ये होते. तसेच तबला वादनामध्ये त्यांचा हातखंडा होता. सोलापुरातील कला क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना या वृत्तामुळे धक्का बसला आहे.