सोलापूर : स्वरनाद संगीत विद्यालयातर्फे हार्दिक पटेल स्मृतीप्रीत्यर्थ महागायक – २०२१ ही स्पर्धा घेण्यात येणार आहे पाच ते पंधरा वयोगटासाठी प्रार्थमिक तर पंधरा वर्षाच्या पुढील खुला गट अशा दोन गटात ही स्पर्धा होत असून १२ जुलैपर्यंत सहभाग नोंदवता येईल.
२० जुलैपर्यंत व्हिडिओ पाठवायचे असून ऑनलाइन व्हिडिओतून दोन्ही गटात प्रत्येकी दहा स्पर्धक निवडण्यात येतील व त्यांची अंतिम फेरी निर्मलकुमार फडकुले सभागृहात घेण्यात येईल, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. दोन्ही गटासाठी भरघोस बक्षिसे ठेवण्यात आली असून या गायन स्पर्धेसाठी बोल्ली टायर्स, आपटे फार्मा आणि भारत पेंट कंपनी यांचे सहकार्य लाभले आहे. पत्रकार परिषदेस हरेशभाई पटेल, हेमाबेन पटेल, नागेश पवार, यामीनी गांधी आदी उपस्थित होते. स्पर्धेत भाग घेण्यासाठी 96654 61293 अथवा 82650 74795 या मोबाईलवर संपर्क साधावा.