सोलापूर: भाजप प्रणित महाराष्ट्र किसान सेल मोर्चा तसेच सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या असून या स्पर्धा भवानी पेठेतील जयभवानी प्रशाला येथे घेण्यात आल्या होत्या सोलापूर जिल्ह्यातील १६ संघांनी या कबड्डी स्पर्धेत सहभाग घेतला होता किसान सेलचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत देशमुख यांनी हि माहिती दिली. ते म्हणाले, यातून जिल्हासंघ निश्चित करण्यात येणार आहे. या स्पर्धा खुल्या गटातील आहेत. युवकांमध्ये कबड्डी सारख्या पारंपारिक खेळाची आवड निर्माण व्हावी हा हेतू या स्पर्धा आयोजना मागे असल्याचं त्यांनी बोलताना सांगितलं अत्यंत चुरशीच्या लढतीत स्वराज्य स्पोर्ट्स क्लबने प्रथम पारितोषिक पटकावलं तर अंजुमन क्रीडा मंडळाने द्वितीय पारितोषिक पटकावलं तर तृतीय पारितोषिक श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांना माजी नगरसेवक डॉ किरण देशमुख यांच्या हस्ते देण्यात आलं यावेळी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत देशमुख किसान मोर्चाचे सदस्य नितीन गडधरे, विश्रांती भसनूर सांगोला नगरपरिषदचे नगराध्यक्ष नवनाथ पवार संदीप जाधव राष्ट्रीय खेळाडू संजय मोतेकर राजकुमार आयगोळे प्रकाश जाधव उपस्थित होते.
ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळवण्यासाठी व तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थान निर्माण होण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडियाच्या माध्यमातून युवकांमध्ये खेळ प्रती आवरण निर्माण करून उत्साह निर्माण केला आहे याचाच भाग म्हणून महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात किसान मोर्चाच्या माध्यमातून कबड्डी स्पर्धेचा आयोजन करण्यात आला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंसाठी एक चांगल्या प्लॅटफॉर्म मोर्चाच्या माध्यमातून दिला असून येणाऱ्या काळात या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक जण प्रेरणा घेतील व तसेच खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करतील अशी भावना माजी नगरसेवक किरण देशमुख यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.