अक्कलकोट : प्रतिनिधी : राज्यातील मंदिर व प्रार्थना स्थळे पाडव्याच्या मुहूर्तावर भाविकांना खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला. त्याप्रमाणे श्रध्दास्थान श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ देखील स्वामी भक्तांना कोरोना बाबतचे सर्व ते नियम कटाक्षाने पाळत महाप्रसाद दिला जात आहे. मंडळाने महाप्रसादाचे सुरु केल्यामुळे भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे.अन्नछत्र मंडळाकडून दि.15 मार्च पासून अन्नदान सेवा पूर्णपणे स्थगित होते. गेल्या आठ महिन्यापासून सर्व कामकाज ठप्प होते. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार महाप्रसाद सेवा सुरु करण्यात आलेली आहे.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन दिवसापासून सुरु करण्यात आलेल्या महाप्रसाद सेवेला सुरुवात करण्यात आलेले आहे. मात्र महाप्रसाद घेण्याकरिता येणार्या भाविकांत सामजिक अंतर, थर्मलगन चेकींग, मास्क व सॅनिटायझर करुनच महाप्रसाद गृहात प्रवेश दिला जात असून महाप्रसाद गृहालगत बफे पध्दतीने महाप्रसाद दिला जात आहे. महाप्रसाद गृहात सामाजिक अंतर ठेवून स्वामी भक्तांना दिला जात आहे.अत्यंत चांगल्या पध्दतीने शासनाची योजना अन्नछत्र मंडळाकडून राबविली जात आहे. ही योजना राबविण्याकामी न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले हे स्वत: लक्ष ठेवून आहेत. न्यासाचे पदाधिकारी सेवेकरी, कर्मचारी देखील सर्व ते नियम पाळत स्वामी भक्तांना सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
महाप्रसाद घेण्यासाठी स्वामीभक्त हे रांगेत सर्व ते नियम पाळत उभे राहून टप्प्या-टप्प्याने सामाजिक अंतराने महाप्रसाद घेण्यासाठी प्रसाद गृहात सोडले जात आहे. अन्नछत्र मंडळ सुरु झाल्याने स्वामी भक्तांची चांगली सोय महाप्रसादामुळे झाल्याने मंडळाने कोरोनाच्या बाबतीत केलेल्या उपाय योजनेबाबत कौतुक व समाधान व्यक्त होत आहे.
श्रीक्षेत्रे अक्कलकोटच्या वैभवात भर टाकणारी भाविकांची आकर्षणाची ठिकाणी असलेल्या न्यासाच्या परिसरातील शिवसृष्टी, शिवचरित्र, धातूशिल्प प्रदर्शन, भव्य कारंजा, श्री स्वामी समर्थ वाटिका, बालोद्यान, दिपमाला, कपिला गाय, श्री स्वामींची 30 फूटी उभी मूर्ती, सिंहासनाधिष्ठीत छत्रपती शिवाजी महाराज मूती हे देखील कोरोनचाया बाबतीत घालून दिेल्या नियमांचे पालन करीत सुरु करण्यात येणार आहेत.
दरम्यान कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अन्नदानाची स्वामी सेवा गेल्या 8 महिन्यापासून पूर्णपणे स्थगित असताना हे न्यास शहरातील गरिब, निराधार, निराश्रितांना असे 1 हजार जणांना जेवण दिल्याचे कार्य करीत आहेत. शासनाने अन्नछत्रच्या यात्री निवास इमारतीत कोवीड सेंटर सुरु केले होते. या ठिकाणी सलग 5 महिने 200 पॉझिटिव्ह रुग्णांना दररोज चहा, नाष्टा, दोन्ही वेळचे जेवण दिले. येथील लोेकांच्या तक्रारीने कोवीड सेंटर अन्यत्र हलविले पण त्यासाठी शासनाने 50 बेड, गाद्या, उशा बेडशीट आदी मागणी केली व सदरची पूर्तता न्यासाने केलेली होती. तसेच ससुन हॉस्पिटल पुणे यांना व्हेंटीलेटरसाठी 2 लाखांची देणगी दिली. तसेच शहर व ग्रामीण भज्ञगात निर्जंतुकीकरण औषध फवारणीचे कार्य सातत्याने सुरुच होते.
कटाक्षाने पालन : गेल्या 8 महिन्यापासून अन्नछत्र मंडळ बंद होते. आता शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे सुरु करण्यात आलेले आहे. मंडळात आलेला भक्त हा नियमाचे पालन करीत आहेच, मंडळाकडून शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन केले जात आहे.
जन्मेजयराजे भोसले, संस्थापक अध्यक्ष
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ
यात्री निवास, यात्रीभुवन, पार्किंग येथे फवारणी
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे निवास व्यवस्था असलेले यात्री निवास, यात्री भुवन, पार्किंग येथे देखील सॅनिटायझर बरोबरच स्वच्छता बाबतीत विशेष लक्ष दिले जात आहे.
मन तृत्प :
आम्ही सहकुटूंब महिन्यातून दोनवेळा श्रीक्षेत्र अक्कलकोटला येतो. ‘श्रीं’च्या दर्शनानंतर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात महाप्रसाद घेतोच. लॉकडाउन नंतर पहिल्यांदा आम्ही आलो. दर्शनानंतर महाप्रसाद घेतल्यानंतर मन तृप्त झाले.
श्रीनिवास महिंद्रकर, पुणे
चांगली सोय : कोरोनामुळे 8 महिन्यापासून सर्वच धार्मिक स्थळे बंद होती. पाडव्याला सुरु झाली. अन्नछत्र मंडळाने केलेली व्यवस्था चांगली आहे.
महेश देवरुखे, मुंबई बांद्रा