सोलापूर – तीन दिवसांपासून घरातून बेपत्ता झालेल्या अभिजीत नागेश मोरे ( वय ३० ) रा. गावडी दारफळ या तरुणाचा मृतदेह गटारीच्या पाईप मध्ये आढळून आला. हा प्रकार उत्तर सोलापूर तालुक्यातील गावडी दारफळ येथे गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला .
अभिजित मोरे हा मंडप कॉन्ट्रॅक्टर होता. 16 जून रोजी रात्री तो घरातून बाहेर गेला आणि पुन्हा परतलाच नाही . गुरुवारी त्याचे घरचे पोलिसात मिसिंग दाखल करण्याच्या तयारीत होते त्याच दिवशी दुपारी त्याचा मृतदेह गटारीच्या पाईप मध्ये आढळला . नागरिकांनी सोलापूर तालुका पोलिसांना खबर दिली. घटनास्थळी पोलीस शिपाई एस.एस.शिंदे दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह बाहेर काढला. अभिजीतच्या पश्चात आई-वडील व एक लहान बहिण आहे. हातभट्टी दारूची दुकान बंद करण्यासाठी त्यांनी तक्रार केली होती. यातूनच त्याच्यासोबत घातपात झाला असेल अशी शंका नातेवाईकांनी व्यक्त केली