येस न्युज मराठी नेटवर्क : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणाचा तपास करून सीबीआयला सहा महिने झाले. सीबीआयने सुशातसिंह राजपूत प्रकरणाचा तपास केला. सुशांतसिंह याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली, यासंबंधीचा चौकशी अहवाल सीबीआयनं जाहीर करावा, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येथे केली.
सिव्हिल लाइन्समधील पोलिस जीमखाना इथं गृहमंत्र्यांनी गुन्हे आढावा बैठक घेतली.त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सुशांतसिंहची हत्या झाल्याची शंका उपस्थित करून गोंधळ माजविण्यात आला. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सीबीआयला सोपविण्यात आली. सीबीआयच्या तपासाला आता सहा महिन्यांचा कालावधी लोटला. सुशांतसिंह प्रकरणात नेमकं काय झालं हे गृहमंत्री या नात्यानं अनेकजण आपल्याकडं विचारणा करतात. सुशांतची हत्या झाली की त्यानं आत्महत्या केली ,असा प्रश्न विचारतात. त्यामुळे सीबीआयनं चौकशी अहवाल जाहीर करून सुशांतच्या मृत्यू नेमका कशानं व कसा झाला हे जाहीर करावं. सीबीआयनं चौकशी अहवाल जाहीर केल्यास त्याचे चाहते व महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील संभ्रम दूर होईल,असेही ते म्हणाले.