No Result
View All Result
- दोन आठवडे ठाकरेंच्या आमदारांवर कारवाई करता येणार नाही, मात्र आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे. पक्ष आणि चिन्हावर दोन आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टात जोपर्यंत सुनावणी सुरु आहे, तोपर्यंत मशाल हे चिन्ह ठाकरे गटाला कायम ठेवण्यात येणार आहे, असे कोर्टानं सांगितलं आहे.
- निवडणूक आयोगानं शुक्रवारी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर लगेच ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली. निवडणूक आयोगाच्या निर्णायावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला. सुरुवातीला सुप्रीम कोर्टानं यावर तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर आज यावर सुनवणी झाली. यामध्ये दोन्ही गटाकडून जोरदार युक्तीवाद झाला.
- सुप्रीम कोर्ट याप्रकरणाची पुढील सुनावणी घेत नाही, तोपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आधारावर व्हिप काढला तर ठाकरे गटाला लागू होणार नाही. ठाकरे गटाच्या आमदारांविरोधात व्हिप काढणार नाही, अपात्र करणार नाही, असे आश्वासन शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात दिले आहे.
- यावर कपिल सिब्बल म्हणाले की, हा फक्त व्हिप पुरता मर्यादीत मुद्दा नाही. कारण अनेक अर्थांनी हा मुद्दा महत्वाचा आहे. कारण व्हिप बाजूला ठेवला तर पक्षाच्या संपत्ती आणि मालमत्तेवर ताबा मागितला जाऊ शकतो. त्यामुळे या निर्णायाला संपूर्ण स्थिगिती द्यावी.
No Result
View All Result