मुंबई : सुनील तटकरे यांची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अजित पवार या संदर्भात अधिकृत घोषणा करणार आहेत. देवगिरीवर झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. पक्ष पातळीवरती पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी अजित पवारांनी सुरुवात केली आहे.