सोलापूर : सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार सुनील सोनटक्के यांनी आज घेतला. सोनटक्के यांच्याकडे कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाचाही पदभार आहे. यावेळी माहिती सहायक धोंडिराम अर्जुन, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब वाघमोडे यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
सोनटक्के यांनी यापूर्वी जळगाव माहिती अधिकारी, हिंगोली जिल्हा माहिती अधिकारी, लातूर जिल्हा माहिती अधिकारी, लातूर उपसंचालक पदाचा अतिरिक्त पदभार यशस्वीपणे सांभाळला आहे. मागील विधानसभेच्या निवडणूक कालावधीत सोनटक्के यांनी दिड महिना सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी पदाचा पदभार सांभाळला आहे.