मुंबई – सोलापुरातील फुरडे कन्स्ट्रकशन्स चे सुनील फुरडे यांची क्रेडाई च्या सन २०२३ ते २०२५ कालावधीसाठी राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
याचा पदग्रहण समारंभ शनिवार दि. १५ एप्रिल रोजी मुंबई येथील ताज हॉटेल येथे पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्याचे मंत्री दीपक केसरकर, महारेराचे चेअरमन अजोय मेहता, नगरविकास सचिव भूषण गगराणी, सतीश मगर, शांतीलाल कटारिया यांच्यासह बांधकाम क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यायसायिक व उद्योजक यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी झूम अँपद्वारे केंद्रीय मंत्री पियुष गोयल, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेला मार्गदर्शन केले व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्राद्वारे बांधकाम व्यावसायिकांच्या देशाच्या विकासात योगदानाबद्दल व क्रेडाईच्या कार्याबद्दल कौतुक करून नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
राष्ट्रीय कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – अध्यक्ष बोमन इराणी (मुंबई), उपाध्यक्ष – सुनील फुरडे (महाराष्ट्र -सोलापूर), आनंद सिंघानिया (छत्तीसगढ), श्रीधरन स्वामिनाथन ( तामिळनाडू), नंदू बेलाणी (पश्चिम बंगाल), शोबित मोहन दास ( उत्तर प्रदेश), दीपक गरोडिया (मुंबई) तर सचिव पदी राम रेड्डी (तेलंगणा) यांची निवड झालेली आहे. तसेच क्रेडाई भारतामधील क्रेडाईच्या मजबुतीकरण व वाढीसाठीच्या कमिटी चेअरमन पदी सोलापूरचे शशिकांत जिद्दीमनी यांची निवड करण्यात आली.
क्रेडाई ही बांधकाम व्यावसायिकांची शिखर संघटना असून २१ राज्यात २१७ शहरात संघटनेच्या शाखा आहेत. व १३००० हुन अधिक सभासद आहेत. क्रेडाई बांधकाम क्षेत्राला विकसित करणे, ग्राहक हित जोपासणे व शासनासोबत पॉलिसी तयार करण्यामध्ये मदत करते.