एक तास स्वच्छतेसाठी ही मोहिम पार पाडल्या नंतर संविधान उद्देशीका स्तंभाजवळ अधिकारी व कर्मचारी यांचे समवेत स्वच्छतेवर घोषणा देत असताना एक दिव्यांगही घोषणा देत सहभागी झाले. ते जमिनीवर बसले असताना जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी दिव्यांगासाठी खुर्ची मागवून घेतली. स्वत उभा राहून स्वच्छतेच्या मोहिमेत सहभागी झाले. त्यांचे संवेदनशील तेची चर्चा परिसरात सुरू होती. अनेक दुकानदार देखील जिल्हाधिकारी यांनी स्वत कचरा उचलायला सुरूवात केले नंतर सहभागी झाले.