भविष्यातील अधिकारी घडविण्यासाठी शालेय स्पर्धा परीक्षा उपयुक्त : गटशिक्षणाधिकारी विकास यादव
सोलापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर १ मोडनिंब येथे विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी बोलताना माढा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विकास यादव यांनी वरील उद्गार काढले. जिल्हा परिषद सोलापूर,शिक्षण विभागाच्या वतीने इयत्ता चौथी व इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक 2 मार्च 2025 रोजी घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये माढा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावणारा विद्यार्थी क्षितिज प्रकाश रणदिवे(इयत्ता चौथी) व माढा तालुक्यामध्ये तृतीय क्रमांक मिळविणारा यश दीपक बागल (इयत्ता सातवी) यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सत्कारप्रसंगी बोलताना विस्तार अधिकारी डॉ.शिवराज ढाले यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी योग्य मार्गदर्शन,सराव आणि सातत्य ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या मंथन प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये राज्य गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळविणारे विद्यार्थी वरूण नवनाथ माळी,वरद महेश व्यवहारे, हर्षवर्धन सोमनाथ भालेराव, क्षितिज प्रकाश रणदिवे,आर्शान आसिफ आतार,मयुरेश महेश व्यवहारे आणि जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविणारे कृष्णमीत हेमंत गडेकर,सिद्धार्थ सचिन लोंढे, सारंग संतोष सुर्वे,शिवरत्न गणेश हाके,आर्यन प्रकाश मुळीक,राजरत्न गणेश हाके,रघुवीर शरद थोरात, अर्शान आसिफ आतार,वेदांत सिद्धेश्वर मोरे व आरव श्रीकांत मोहिते तसेच इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिपियाड मध्ये गोल्ड मेडल मिळविणारे विद्यार्थी रघुवीर शरद थोरात,विराज प्रवीण सावंत, अद्वैत श्रीदत्त पिंपळे,आदित्य मसुदेव चव्हाण, ओम अमोल माळी,शशांक शरद थोरात,व्यंकटेश दिलीप बैरागी आणि ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेमध्ये मेडलप्राप्त विद्यार्थी कृष्णमित हेमंत गडेकर, रघुवीर शरद थोरात, अद्वैत श्रीदत्त पिंपळे, विराज प्रवीण सावंत,क्षितिज प्रकाश रणदिवे,आदित्य मसुदेव चव्हाण, शशांक शरद थोरात,ओम अमोल माळी व शिव राजू कोठावळे या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे जयश्री शिंदे मॅडम,अशोक ढोबळे सर,अतुल थोरात,संगीता सावंत मॅडम, दादासाहेब गायकवाड सर,मोहन चव्हाण सर, विद्या भानवसे मॅडम, स्वाती निचळ मॅडम,निलिमा जाधव मॅडम व मसुदेव चव्हाण सर यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माढा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विकास यादव साहेब,विस्तार अधिकारी डॉ.शिवराज ढाले साहेब,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष बालाजी गायकवाड,शिक्षणप्रेमी राजेश निंबाळकर,मुख्याध्यापक राजन सावंत सर,शिक्षक वृंद व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक ढोबळे सर यांनी तर आभार मुख्याध्यापक राजन सावंत सर यांनी मानले.