मयुरी भालेराव, सुरज रेणके, नागेश माने यांनी द्वितीय क्रमांक पटकावले
सोलापूर : राष्टीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली व राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी दयानंद विधी महाविद्यालय येथे आंतरमहाविद्यालयीन मूट कोर्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेत दयानंद विधी महाविद्यालयातील विधी विद्यार्थी मयुरी भालेराव,सुरज रेणके,नागेश माने यांनी द्वितीय क्रमांक संपादन केले तर आकांक्षा टोणगे,संपदा संगा, श्रेयश पाटील यांनी सहभाग नोंदवले.या यशाबद्धल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ऍड.मंगपाती राव व मार्गदर्शक तथा विषयतज्ञ ऍड.प्रा.मल्लिकार्जुन हिंगमीरे यांनी अभिनंदन केले.
यावेळी अभिनंदन करताना प्रा.मल्लिकार्जुन हिंगमीरे म्हणाले की, आपल्या भारतात कायद्याचे राज्य आहे. कायदे हे नेहमीच आपले हक्क व अधिकाराचे संरक्षण करण्या करीता असतात. लोकहितवादी व कल्याणकारी राज्याला बाधा निर्माण झाल्यास त्याला कायद्याचे सरंक्षण दिले जाते. तसेच समाजातील सर्व प्रकारची गुन्हेगारी थांबली पाहिजे. यात न्यायालयाची सर्वात अव्वल कामगिरी असते. कामगिरीत उत्तम भागीदारी विधिज्ञ आणि न्यायमूर्ती बजावतात.या अनुषंगाने महाविद्यालयात प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाज आणि प्रक्रीया याची माहिती दिली जाते.या माहितीच्या आधारे मुट कोर्ट भरवले जाते. विद्यार्थ्यांमधील आवांतर कौशल्य,आत्मविश्वास, वकिलीपेशाचे अध्ययन,युक्तिवाद , वाद विवादाची तयारी इ. मुट कोर्टच्या माध्यमातून प्रकट होते. मुट कोर्ट म्हणजे प्रतिकात्मक न्यायालय होय. यात चांगली तयारी करून आंतरमहाविद्यालयीन मुटकोर्ट स्पर्धेत दयानंद विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले ही अभिनंदनीय बाब आहे.
यावेळी प्रा.एस.दंतकाळे,प्रा. एस.गायकवाड,प्रा.कटाप आदींनी विशेष अभिनंदन केले