पंढरपूर : मोडनिंब परिसरात माढा उपसा सिंचन योजनेचे रखडलेले काम पुन्हा सुरू करण्यात आले असून या प्रकरणी मनसे नेते प्रशांत गिड्डे यांच्या प्रयत्नास यश आले आहे. आता या कालव्याचे काम पूर्ण होणार असल्याचा आनंद, या परिसरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
माढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मना मनात भिनलेली माढा उपसा जलसिंचन योजना, मोडनिंब परिसरात रखडली होती. या योजनेअंतर्गत वितरिका क्रमांक ८ चे काम काही शेतकरी शासकीय कार्यालय तसेच लोकप्रतिनिधी यांच्या संघर्षात रखडले होते. मोडनिंब जवळील जाधववाडी परिसरात हे काम थांबले होते. अनेकदा चालू झालेले काम थांबले होते. यामुळे या वितरिका क्रमांक ८ चे काम पूर्णत्वास जाईल , याबाबत संशय व्यक्त होत होता. सहाजिकच
येथील शेतकऱ्यांमध्ये याबाबत निराशा पसरली होती. मोडनिंब परिसरातील या रखडलेल्या कालव्याच्या खोदाई प्रकरणी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे तसेच विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष राहुल सुर्वे यांनी मध्यस्थी करून मोठा पाठपुरावा केला आहे. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून, या कालव्याच्या खोदाईचे काम गुरुवारी सुरू करण्यात आले आहे. हे काम सुरू करण्यापूर्वी या कामाचे पूजन मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जलसंपदा विभागाचे देवकर साहेब, करडे साहेब , विकास पाटील, शेतकरी प्रतिनिधी ब्रह्मदेव पाटील , रावसाहेब नाना पाटील, विद्यार्थी नेते राहुल सुर्वे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सौदागर जाधव, बाजार समितीचे माजी सभापती मोहन मोरे , बैरागवाडी गावचे सरपंच गणेश सुर्वे, उपसरपंच 1
दत्तात्रय सुर्वे उपस्थित होते.