सोलापूर (प्रतिनिधी): पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख आणि जितेंद्र पवार यांना सोलापूर शहर जिल्ह्यातून चांगले मताधिक्क्य मिळवून देत निवडून आणू असे प्रतिपादन आ. सुभाष देशमुख यांनी केले.
भाजपा दक्षिण सोलापूर आणि उत्तर तालुका प्रमुख पदाधिकार्यांची बैठक सोलापूर येथील पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत आ. देशमुख बोलत होते. या बैठकीस पदवीधर मतदारसंघातील उमेदवार संग्रामसिंह देशमुख, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, अविनाश महागावकर, शशीकांत चव्हाण, दक्षिणचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, हणमंत कुलकर्णी, यतीन शहा, महादेव कमळे, अप्पास कदम, अण्णाराव बाराचारी, प्रशांत कडते, श्रीमंत बंडगर, पंडित कोरे, संगप्पा केरके यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, शहाजी पवार, हणमंत कुलकर्णी यांच्यासह उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांची भाषणे झाली. तालुकाध्यक्ष अप्पास कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
संग्राम देशमुख यांचा आ. देशमुख यांच्या निवासस्थानी सत्कार
पुणे पदवीधरचे उमेदवार संग्राम देशमुख यांनी बुधवारी सकाळी आ. सुभाष देशमुख यांच्या निवास्थानी भेट दिली. यावेळी युवा नेते रोहन देशमुख यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी आ. सुभाष देशमुख, मनिष देशमुख उपस्थित होते.