फेब्रुवारी – मार्चमध्ये होणारी दहावीची परीक्षा गैरप्रकारमुक्त होण्यासाठी परीक्षा मंडळातर्फे 26 जानेवारी पर्यंत कॉपीमुक्त जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनी शाळांमध्ये कॉपीमुक्तीची शपथ घेतली जाईल, अशी माहिती कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. गावस्तरावर कॉपीमुक्त अभियानाची शाळा पातळीवर अंमलबजावणी करण्याबाबत प्राचार्य व मुख्याध्यापकांना माहिती देण्यात आली आहे.

