आस्था फाऊंडेशन संचलित आस्था रोटी बँकेला
एक मुठ्ठी अनाज दिलय MIT विश्वशांती गुरुकुल शाळेच्या विदयार्थ्यांनी
आज MIT world Peace University Pune सोलापुरातील विश्वशांती गुरुकुल MIT शाळेच्या विदयार्थ्यांनी संस्थेच्या ट्रस्टी सेक्रेटरी जनरल आॕफ MIT VGS माननीय स्वाती कराड चाटे मॕडम यांच्या वाढदिवसानिमित्य हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला
प्रथमतः गुरुवंदना आस्थाच्या टिमच स्वागत करण्यात आल संस्थेतर्फे MIT च्या कोआॕर्डीनेटर नमिता आतणीकर यांनी माहिती दिली गेल्या 12/13 वर्षांपासून ही संस्था कार्यरत आहे सोलापुरातील बाळे परिसर,वडाळा,सोलापुरातील काही भागांमधून अनेकोनेक students इथ शिकायला येतात.
जवळजवळ 600 विदयार्थीं सध्या इथ शिक्षणाकरिता येतात तर आजचा उपक्रमात MIT च्या प्राथमिक शाळेकडून राबवण्यात येत आहे तदनंतर
हे एक मुठ अनाज हया विदयार्थींनी दान करण्यासाठी आणल त्याच महत्त्व आस्थाच्या वतीने निलिमा हिरेमठ , छाया गंगणे व निता आक्रुडे,ज्योती शटगर यांनी सांगितलं
आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण जिथ पैसा कमवण्याच्या मागे आहे तिथे समाजाने नाकारलेल्या आजी आजोबांना कोण वेळ देतोय ?कोण त्यांच्या प्राथमिक गरजा पुर्ण करतोय मग आस्था सारख्या संस्थेला पुढाकार घ्यावा लागतो.कारण एकच वाढती महागाई किंवा जीवनमानात बदलेला आचारविचार तिथे घरातील हे वयोवृध्द आजीआजोबा नको असलेली अडगळ वाटतात पर्यायाने त्यांना कोणत्या तरी वृध्दाश्रमात किंवा तात्पुरती सोय करुन वेगळे ठेवले जाते
पुढे चुकून ही त्यांची भेट घेतली जात नाही
ना खुशाली कळवली जाते.
अश्या आजी आजोबांना आपण आस्था रोटी बँकेतर्फे हा कोरडा शिधा देतो ज्यामध्ये महिनाभर पुरेल असे गहू,ज्वारी,दाळ,तेल,साखर,चहापत्ती कधी कधी गॕस रिफिल करुन दिले जाते. हयांना देण्यात येणारे धान्याच किट घरपोहच देण्यासाठी आस्थाचे सर्वेसर्वा विजय छंचुरे कार्यरत असतात.
संस्थेच्या विविध उपक्रमाची माहिती ही दिली गेली
एक मुठ्ठी अनाज ने असा जास्त फरक पडत नाही कारण हे अन्नदानाच काम 365 दिवस चालते परंतु हे तुम्हा विदयार्थ्यांसोबत उपक्रम राबवत आहोत. कारण तुमच्या पैकी एका जरी कुटुंबांने त्यांच्या घरातील ज्येष्ठांना सन्मान दयावा त्यांच्या उतारवयात वृध्दाश्रम दाखवू नये हेच संस्काराचे बीज हया बालमनावर बिंबवण्याच काम करत आहे हे एक मुठ्ठी अनाज.
कारण उदया हिच पिढी तारुण्यात गेल्यावर त्यांच्या घरी नकळत घडलेल्या चुकांची पुनरावृत्ती करु नयेत म्हणून च आस्था फाऊंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे हा उपक्रम राबवण्यात येतो. असे विचार मांडले छाया गंगणे यांनी तर संस्थेच्या वतीने आभार मानले. निलिमा हिरेमठ यांनी शेवटी सर्वांनाच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन केल MITशाळेच्या मनिषा पुराणी व नमिता मॕडम त्यांच्या शिक्षक वर्गाने आजच्या हया एक मुठ्ठी अनाजातून जवळजवळ 3 पोते धान्य विदयार्थींनी जमा केले.
हे धान्य सिव्हिल हॉस्पिटल मधील पेशंट वर नातेवाईकांना तसेच सोलापुरामधील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या निराधार महिला व कुष्ठरोग वसाहत मधील महिलांना अन्न वाटप करतो. आस्था रोटी बँक नेहमी असे उपक्रम राबवत असते जेणेकरून गरीब लोकांना मदत मिळते.