गुणवत्तेत अव्वल स्थान मिळवणार्या विद्यालयात पोदार इंटरनॅशनल स्कूलला प्रथम पसंती दिली जाते. विद्यालयाचा विद्यार्थी शुभम पाणिग्रही या विद्यार्थ्यांने 96.80% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. विभा वैद्य हिने 96.00% गुण मिळवून द्वितीय क्रमांक व सात्विक भोसले या विद्यार्थ्यांने 95.80% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे एकूण विद्यार्थ्यांतून अठरा विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण प्राप्त केले. शुभम पाणिग्रही या विद्यार्थाला संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण मिळाले.
प्रचिती शिंदे हिने मराठीत 100 पैकी 100 गुण मिळवले.तर सामाजिक शास्त्र विषयात यसीरा नूर व वरूण निगुडकर या विद्यार्थांना 100 पैकी 100 गुण मिळाले. शाळेचे प्राचार्य समरेन्द्र पाणिग्रही सर ,उपप्राचार्य रामहरी घाडगे , आरती झवेरी, सिद्धराम राऊर,मीनाक्षी पवार ,गीता अंकुशराव ,आम्रपाली माने ,संतोष वाळवेकर , लक्ष्मण उपाडे , विजयालक्ष्मी मुदगी,शाळेचे प्रशासकीय अधिकारी कॅप्टन नदाफ व्ही.सी.,अमर जगझापे , शाळेचे एच.आर.विनायक साळुंके व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गानी शाळेच्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.