येस न्युज मराठी नेटवर्क : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूर व शिक्षण विभाग जि. प. सोलापूर, अमेझॉन फ्युचर इंजिनिअर, लीडरशीप फॉर इक्विटी आणि कोड टु एनहान्स लर्निंग संस्था, यांच्या संयुक्त सहकार्याने दोन दिवसीय जिल्हास्तरीय कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्सव जिल्हा पातळीवर २९ व ३० जानेवरी रोजी २०२४ सोलापूर इथे संपन्न झाला. जिल्ह्यातील जिल्हा परिषद, मनपा शाळामधील मधील ग्रामीण, आदिवासी आणि शहरी ४०९७ विद्यार्थ्यानी पहिल्या टप्प्यात नोंदणी करून सहभाग घेतला होता. त्यापैकी १७८२ विद्यार्थ्यानी अनप्लग (कम्प्युटर शिवाय) चॅलेंज सोडवले होते. या विद्यार्थ्यापैकी या अनप्लग चॅलेंज मधील अचूक मांडणी आणि उत्तमपणे कामगिरी केलेल्या मुलांची या निकषा आधारे जिल्हास्तरावर १० शाळांमधील ३० विद्यार्थ्याची कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्सवासाठी निवड करण्यात आली.
निवड झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यानी स्क्रॅच प्लॅटफॉर्मवर कोडींग करत त्या समस्यावर उपाय शोधून कोडींगच्या सह्यायाने गेम,अॅनिमेशन आणि अॅप्लिकेशन स्वरूपात प्रोजेक्ट तयार केले. कोडींग प्रोजेक्ट तयार करताना विद्यार्थी एकविसाव्या शतकातील कौशल्ये जसे की चिकित्सक विचार (Critical thinking), सहकार्य (Collaboration), संवाद कौशल्ये (Communication), समस्या निवारण (Problem Solving) यांचा वापर केला. हि कौशल्य नवीन शैक्षणिक धोरण सुचवते की शाळांमध्ये शिकवली गेली पाहिजे, हा प्रोग्राम या धोरणाशी सलग्न ठरत आहेत. या उत्सवात त्यांना आजूबाजूच्या समस्येवर आधारित कोडींग करून प्रोजेक्ट बनवून मान्यवरांसमोर सादर केली. हे व्यसनधीनता, श्वसन विकार, भटक्या विमक्तांचे प्रश्न, लोकांचा आदर, कचरा व्यवस्थापन आदी या प्रकारच्या समस्या घेऊन तयार करण्यात कोडिंगच्या प्रोजेक्ट सादर करण्यात आली होती.
उत्सवामध्ये प्रथम पारितोषिक मनपा उर्दू शाळा क्र.२ तर द्वितीय पारितोषिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुळवंची आणि तृतीय पारितोषिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाळगी यांनी पटकावला. एकूण सर्व १० शाळांना ही परोतोषिके देण्यात आली यात पहिल्या पाच शाळांना ४३ इंची LED टीव्ही देण्यात आला तर इतर ५ शाळांना टॅब व रोख बक्षिसे देण्यात आले. आणि पहिला आणि दुसरा क्रमांक आलेल्या शाळेला राज्यस्तरीय हॅकेथॉन उत्सवासाठी निवड करण्यात आली.
कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्सवाला माननीय प्रमुख उपस्थिती गटशिक्षण अधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी, क्रांती महिला संघ अध्यक्ष रेणुका जाधव, निलोफर मॅडम मनपा, पत्रकार संतोष पवार, आदी उपस्थीत होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत बक्षीसे हस्ते प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाचे मूल्यांकन सोलापूर सकाळचे पत्रकार प्रकाश सनपुरकर आणि लीडरशिप इक्विटी संस्थेची तुकाराम लाळगे यांनी केले. हा उत्सव इरफान ललानी, मुख्यकार्यकारी अधिकारी, कोड टु एनहान्स लर्निंग, संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला असून. या उत्सवामध्ये खूप उत्साहाने शिक्षकानी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वतेसाठी लीडरशिप फॉर इक्विटी आणि कोड टू एन्हांस लर्निग संस्थेच्या टीम ने मेहनत घेतली.