सोलापूर : वयाची सुमारे ६५ वर्षे जंगलात राहून अखंडितपणे वन्यजीव निरीक्षण करत निसर्गानुभवाला शब्दशिल्पाची रूपकळा प्राप्त करून देणारे आणि मराठी भाषेला सुमारे एक लाख शब्दांची देणगी देणारे श्रेष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे.आज सोलापुरातील जेष्ठ साहित्यिक पद्मश्री मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला त्यामुळे त्यांची भेट सहस्रार्जुन शैक्षणिक संकुलाच्या वतीने विद्यार्थी आणि शिक्षक यांनी साहित्यिक भेट म्हणून संवाद साधला. या भेटीत सातवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी संवाद साधला.
सरांनी वाचनाचे महत्त्व सांगितले, संस्काराने माणूस घडतो यासाठी वाचनाचे महत्त्व सांगितले, पक्षी निरीक्षण, जंगलातफिरणे वन्यजीवांचा अभ्यास करणे आवश्यक आहे असा संदेश दिला. एक लाख पुस्तकांचे वाचन केले आहे, तुम्ही वाचन करा, स्वतः चे ग्रंथालय घरी असावे असा प्रेरक संदेश दिला. एक मराठीत एक लाख मराठी शब्दांची भर घातली मराठीचे वैभव वाढविले. त्यांना सोळा भाषा अवगत आहेत. कोळीण या सातवीच्या गद्य पाठावरही मुलांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यांचे मार्गदर्शन प्रेरक होते. चकवाचांदण या आत्मचरित्राचे वाचन करण्याची प्रेरणा मिळाली. साने गुरुजींच्या श्यामच्या आईची प्रेरणा घेऊन पुस्तके वाचण्यासाठी कशी प्रेरणा मिळाली हेही सांगितले. आज सरांशी बोलताना समजले की, त्यांनी आतापर्यंत सुमारे पंधरा हजार पुस्तके वाचली आहेत… अजूनही वाचत आहेत… एका मित्राच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहण्यासाठी त्यांचे भले मोठे पुस्तक ते सध्या वाचत आहेत.
त्यांच्याजवळ असलेल्या पुस्तकांचा ठेवा सर्व वाचकांसाठी उपलब्ध व्हावा, याकरिता ते या वयात सोलापूर मध्ये स्वतःच्या खर्चाने वाचनालय उभारत आहेत,हे समजल्यानंतर तर अक्षरशः गहिवरून आले. खरीच ही ग्रेट भेट होती.याप्रसंगी प्राशलेतील शिक्षक सौ.वैशाली अघोर,जयलू कबाडे,संतोषी जाधव व प्रीतम खत्री आदींच्या मार्गदर्शनाखाली पद्मश्री मारुती चितमपल्ली सरांची भेट व संवाद साधला.