सोलापूर : विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकासही तितकाच महत्त्वाचा असतो. दरवर्षीप्रमाणे 2022- 23 या शैक्षणिक वर्षात पोदार इंटरनॅशनल स्कूल सोलापूर ने विद्यार्थ्यांसाठी “छलांग क्रीडा सप्ताहाचे” आयोजन केले. सोमवार दिनांक 21 नोव्हेंबर ते शनिवार दिनांक 26 नोव्हेंबर पर्यंत क्रीडा सप्ताह साजरा करण्यात आला. हा क्रीडा महोत्सव दोन टप्प्यात घेण्यात आला. पोदार जम्बो किड्स च्या ‘जम्बो ऑन व्हील्स ‘क्रीडा महोत्सवाचा समारोप शुक्रवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी करण्यात आला.
पोदार जम्बो किड्स च्या क्रीडा महोत्सवाला प्रमुख अतिथी मान्यवर म्हणून व राहुल गौर (यूपीएससी रँकर 21- बॅडमिंटन प्लेयर ) आणि लक्ष्मी गौर ( बँक ऑफ इंडिया मॅनेजर – स्टेट लेवल टेबल टेनिस खेळाडू )लाभले. सर्व लहान मुलांना आणि त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करताना अतिथी मान्यवर म्हणाले की, आपल्या लहान मुलांबरोबर स्वतः पालकांनी त्यांच्या खेळांमध्ये सहभागी होऊन त्यांना खेळासाठी प्रोत्साहित करावे. या क्रीडा महोत्सवात लहान मुलांच्या अनेक स्पर्धा बरोबर पालकांच्याही काही स्पर्धा घेण्यात आल्या. आपल्या पाल्यांबरोबर खेळताना पालकांचेही बालपण परत आल्याचा अनुभव आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनाक्षी पवार मॅडम यांनी केले.
क्रीडा महोत्सवाच्या दुसऱ्या टप्प्यात पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या अनेक स्पर्धांमध्ये प्रशालेच्या चारही हाऊसच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत गगन भरारी घेतली. विद्यार्थ्यांसाठी सांघिक खेळ आणि मैदानी खेळ यातील अनेक स्पर्धा भरवण्यात आल्या. या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण समारोह शनिवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी मान्यवर म्हणून सौ जयलक्ष्मी श्रेष्ठ ( वरिष्ठ विभाग अधिकारी सेंट्रल रेल्वे ) उपस्थित होत्या. प्रमुख मान्यवर अतिथींचा सत्कार प्रशालेचे माननीय प्राचार्य समरेंद्र पाणिग्रही यांच्या हस्ते करण्यात आला.विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याची क्रीडा ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रशालेचे वरिष्ठ समन्वयक श्री रामहरी घाडगे सर यांच्या वतीने सर्व विद्यार्थी, पालक यांना खेळाची प्रतिज्ञा देण्यात आली. कार्यक्रमातील विशेष म्हणजे अतिशय उत्साहात विद्यार्थ्यांनी केलेल्या मार्चपास्टने सर्वांचे लक्ष आकर्षित केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अनेक कलाविष्काराना पालकांनी मनापासून दाद दिली. सर्व स्पर्धांमध्ये प्रथम,द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सांघिक क्रीडा प्रकारात जेता आणि उपविजेता यांना ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांची ओळख श्री संतोष वाळवेकर सर आणि श्री सिद्धाराम राऊर सर यांनी केले. मान्यवर अतिथी यांनी केलेल्या भाषणातून 26 नोव्हेंबर ताज हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना सर्व प्रशालेतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच संविधान दिनाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वैयक्तिक खेळाबरोबरच सांघिक खेळाला प्राधान्य देऊन स्वत्व विकास साधला पाहिजे असे ते या कार्यक्रमाप्रसंगी म्हणाल्या. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे पालकांसाठी आयोजित केलेल्या स्पर्धेने. क्रीडा महोत्सवाचे अध्यक्ष प्रशालेचे प्राचार्य माननीय समरेंद्र पाणीग्रही सर यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत खेळाचे महत्व विशद केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीतील विद्यार्थी अनुष्का पुराणिक, आरव स्ताव्य, प्रचिती शिंदे आणि प्रथमेश चौधरी या विद्यार्थ्यांनी केले. आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रशालेच्या प्राथमिक विभाग समन्वयक आसमा तडमोड मॅडम यांनी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रशालेचे प्राचार्य माननीय समरेंद्र पाणीग्रही सर, प्रशालेचे व्यवस्थापक व्ही.सी नदाफ, जम्बो किड्स च्या मुख्याध्यापिका आरती जवेरी आदी मान्यवर उपस्थित होते .या क्रीडा महोत्सवासाठी प्रशालेचे प्राचार्य समरेंद्र पाणिग्रही व क्रिडा शिक्षक करण शिंदे आणि दादासाहेब दसाडे यांचे मोलाचे मार्गदर्शक लाभले. प्रशालेचे प्राचार्य समरेंद्र पाणिग्रही यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहाय्य लाभले. अतिशय उत्साहात क्रीडा महोत्सव समारोह संपन्न झाला.