सोलापूर – रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची कमवा व शिका ही तत्वप्रणाली आचरणात अणल्यामुळे बहुजन समाजातील विद्यार्थी घडले त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राची निर्मिती झाली असे मत असे मत म. न. पा. सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत यांनी व्यक्त केले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त सम्राट चौकातील कर्मवीरांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर रयत शिक्षण संकुलाच्या कर्मलक्ष्मी सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी नगरसेवक आनंद चंदनशिवे होते. व्यासपीठावर प्राचार्य हरिभाऊ ढवळे, केतनभाई शहा, इंद्रमल जैन, जयचंद वेद, गौतम संचेती, मंजुनाथ उपाध्ये, डॉ श्रीकांत येळगावकर, नितीन अणवेकर उपस्थित होते.
पुढे त्या म्हणाल्या की कर्मवीरांमुळे वंचित उपेक्षित समाजातील विद्यार्थ्याबरोबरच शेतकरी, शेतमजूर आणि अठरा पगड जातींधर्माच्या विद्यार्थ्याना देखील उच्च शिक्षण मिळाले, ते अधिकार पदावर कार्य करू लागले आणि राज्याचा विकासाच्या दिशेने मार्गस्थ झाले. नगरसेवक आनंद चंदनशिवे म्हणाले की कर्मवीरांच्या संस्थेतील शिक्षक प्रभावीपणे ज्ञानदानाचे कार्य करत आहेत त्यामुळे संस्कारक्षम विद्यार्थ्यांची पिढी राज्याच्या विकासासाठी योगदान देत आहे.
प्रारंभी क्रीडा क्षेत्रातील यशस्वी विद्यार्थ्याना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंत नागणे यांनी केले, आभार संजय जोशी यांनी मानले. यशस्वीतेसाठी राहुल कांबळे, संतोष वालवडकर, अझहर शेख, महावीर आळंदकर, सुनिता पाटील, गौतम शिंदे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, प्रा. उत्तमराव हुंडेकर, डॉ शहाजी देशमुख, राजन दीक्षित, चंद्रकांत घुले उपस्थित होते. सम्राट चौकातील कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा परिसराचे सुशोभिकरण सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या प्रयत्नांतून करण्यात आल्याबद्दल रयत शिक्षण संकुलाकडून प्राचार्य हरिभाऊ ढवळे यांनी धन्यवाद दिले.