सोलापूर- येथील रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मूकबधिर विद्यालयात , रस्ता सुरक्षा आणि सुरक्षित वाहतूक संदर्भात प्रबोधन करताना त्या बोलत होत्या. रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी शालेय विद्यार्थी हेच संस्काराच्या जडणघडणी चा पाया असतात, त्यांच्या मनावर रुजलेली गोष्ट कधीच पुसली जात नाही असे ही त्या म्हणाल्या.
सुरक्षा आणि सुरक्षित वाहतूक कशा पद्धतीने होईल यासाठी स्वतःच्या कल्पकतेने त्यांनी विद्यार्थ्यांच्या वापरातील शालेय वस्तूंमधून रस्ता सुरक्षेचे संदेश दिले. त्यामध्ये-कंपास, पट्टी, पेन, वह्या पुस्तकांवर लावण्यात येणारे नावाचे स्टिकर्स, फ्रेंडशिप बँड, अशा त्याच्या सतत हातात असलेल्या वस्तूवर वाहतुकीसंदर्भातील संदेश चिन्ह छापलेली आहेत. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनावर ठसेल आणि वाहतुकीचे नियम पाळले जातील. अपघाताचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी हे प्रबोधन उपयोगी पडेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
प्रारंभी रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ च्या अध्यक्षा रोटेरियन डॉ जानवी माखिजा यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर शाळेची माहिती आणि प्रास्ताविक मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांनी केले. शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी स्मृतिचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला.
या प्रसंगी दि. 5 व 6 फेब्रुवारी 2024 रोजी दिव्यांगासाठी जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्या अर्चना गायकवाड यांचे हस्ते करण्यात आला. तसेच सांस्कृतिक स्पर्धेत मिळालेले सन्मानचिन्ह या वेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमास शाळेचे सचिव सुनील दावडा, रोटेरियन दीपक आर्वे, संजय चौगुले, आसावरी सराफ, सहायक परिवहन निरीक्षक श्री कोलते, रेणुका पसपुलें, संध्या चंदनशिवे, विजया पिटाळकर, विठ्ठल सातपुते, चिदानंद बेनुरे, गंगाधर मदभावी, अजित पाटील, साहेबगौडा पाटील, गजानन गडगे, सोमनाथ थोरात, बाबासाहेब पवार, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सैपन बागवान यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिव सुनील दावडा यांनी केले.