सोलापूर- धर्मनिरपेक्ष पक्षाचे व पूरोगामी चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांनी यांनी एकत्र येऊन खऱ्या अर्थाने सामाजिक सलोखा उत्पन्न करणारे ईद मिलन कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करुन सलोखा वाढविल्याबद्दल अभिनंदनास पात्र आहेत असे गौरवोद्गार भूमिका मंचाने आयोजित केलेल्या ईद मिलन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे कौमी एकता मंचने आयोजित केलेल्या ईद मिलन कार्यक्रमात केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हुबळी येथे एमसीएची विद्यार्थींनी नेहा हिरेमठ यांच्या हत्येचा निषेध करण्यात येवून दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून आदरांजली वाहण्यात आली. आरोपीला तात्काळ स्पेशल कोर्ट नेमून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

हसीब नदाफ यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात ईद मिलन आयोजनाची भूमिका स्पष्ट करत संविधान रक्षण आणि सामाजिक एकता वाढविण्याची गरज नमूद केली. माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी यांनी सांगितले की,हिंदू बहुल असलेल्या प्रभागात जनतेने मला निवडून दिले आणि राष्ट्रीय एकात्मता प्रत्यक्षात उतरविली असे विचार मांडले.माकपचे नेते माजी आमदार कॉ.आडम मास्तर यांनी केंद्र सरकारच्या धार्मिक द्वेष पसरणाऱ्या शासनाचा आपल्या आक्रमक शैलीत निषेध व्यक्त करत, गेल्या दहा वर्षातील सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या मोदी-शहाला येणाऱ्या निवडणुकीत गुजरातला परत पाठवा असे आवाहन केले. जमिअत उलमा-ए-हिंद चे अध्यक्ष मौलाना हारीस ईशाअती यांनी इस्लाम धर्माने शांतता, मानवता,अहिंसा व न्याय इत्यादी तत्त्वानुसार सामाजिक समतेचा संदेश दिला असल्याचे नमूद केले.
यापूर्वी काही काळ मी भाजपा मध्ये जाऊन आलो.त्यांचं सगळं जाती-जातीत द्वेष पसरविण्याचे राजकारण मला माहित आहे.त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(शपा) नेते महेश कोठे यांनी केले.

शिवसेनेचे नेते प्रा.अजय दासरी यांनी जोशपूर्ण भाषणामध्ये सामाजिक एकतेचे संदेश दिला.
यावेळी मंचचे अध्यक्ष सलीमभाई हिरोली,माजी न्यायाधीश डाॅ.नामदेव चव्हाण, काॅग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील,ॲड.रियाज शेख,ॲड.राजन दीक्षित,लिंगायत समाजाचे विजयकुमार हत्तूरे,श्याम कदम, डॉ.अस्मिता बालगांवकर,मोहन अत्रोळीकर,वाहीद बिजापूरे आदींनी आपले विचार व्यक्त केले. आसिफ इकबालसर यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.आभार प्रदर्शन डॉ.ए.एम.शेख यांनी केले.

या कार्यक्रमासाठी अत्यंत सुरेख व्यवस्थापन शौकत पठाण यांनी केले होते.या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुधीर खरटमल,कार्याध्यक्ष तौफिक शेख,आप पार्टीचे खतीब वकील,निहाल किरनळी,माजी उपमहापौर प्रमोद दादा गायकवाड,मराठा सेवा संघाचे राम गायकवाड,पोपट भोसले अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कॉ.रवींद्र मोकाशी,ॲड.गोविंद पाटील,भटक्या विमुक्त संघटनेचे विष्णू गायकवाड,सुभाष चव्हाण,इतिहासतज्ञ सर्फराज अहमद,भिमशक्ती सामाजिक संघटनेचे प.म.सरचिटणीस राजा कदम,उमेश सुरते,बागबान एज्युकेशन ट्रस्टचे नसिरअहमद खलिफा,डॉ.मन्सूर दलालसर,जमिअतुल कुरेशचे प्रदेशाध्यक्ष हाजी अय्यूबभाई कुरेशी, मंजूर मामा बागवान, मनियार जमातीचे अध्यक्ष अल्लाबक्ष मनियार,कास्ट्राइब संघटनेचे राजा सोनकांबळे, दलित स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष विजय पोटफोडे,जेष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री,हाजी तौफिक हत्तूरे,माजी नगरसेवक विनोद भोसले,सुनिताताई तूपलवंडे,हाजी मैनौद्दीन शेख,हाजी कासिम सय्यद,काॅग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष जुबेरभाई कुरेशी,हाजी अ.सत्तार दर्जी,हाफिज सनाउल्लाह, पैगंबर शेख,नगरसेविका फिरदोस पटेल,वारिस कुडले,कोमारोव्ह सय्यद,शफी हुंडेकरी,माजी नगरसेविका नलीनीताई कलबुर्गी,राजूभाई कुरेशी,मेजर युसुफ,आरपीआयचे सुबोध वाघमोडे,रमेश सुरवसे, समाजवादीचे अबुतालीब डोंगरे,लोकप्रधान न्यूजचे अय्याज शेख,खान कॅम्पसचे साकीब सय्यद,आफताब मुल्ला,हाजी मतिन बागवान पत्रकार दत्ता थोरे, विवेक कंदकुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समिउल्लाह शेख, मुसा जहागिरदार, सलामभाई शेख, मुश्ताक ईनामदार, युसूफ प्यारे,अ.हमीद गदवाल,सरदार नदाफसर, सादिक कुरेशी,सैफन शेख,अफजल चौधरी,आसिफ तिम्मापूरे,बब्बी हुमनाबादकर,अ.अरीम शेख, जहरोद्दीन मुजावर,लालजी नदाफ,नबीलाल शेख,गनी पठाण, माजी नगरसेवक हारून शेख,झाकीर शेख,गुड्डू रंगरेज सुहेल शेख यांनी परिश्रम घेतले.