No Result
View All Result
- सोलापूर : शहरात जड वाहतुकीमुळे अपघातांची संख्या वाढत आहे. लोकांचे बळी जात आहेत. अपघाताची मालिका सुरू असल्याचे दिसून येत आहे. अपघात टाळण्यासाठी येत्या पाच दिवसात जड वाहतूक बंद करावी. प्रशासकीय स्तरावर जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलीस आयुक्तालय आणि वाहतूक शाखा यांच्यात समन्वय साधून एक कृती आराखडा तयार करावा आणि जनहितार्थ प्रसिद्ध करावा अन्यथा पालकमंत्र्यांच्या अहमदनगर येथील घरासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा विविध – पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
- सोलापूर शहरात गेल्या अनेक दिवसापासून जड वाहतुकीमुळे अपघाताची मालिका सुरू आहे लोकांचे बळी जात आहेत. शहरात जड वाहतूक कशी काय सुरू आहे ? जड वाहनांचा अमर्यादित वेग आणि अवाजवी क्षमतेपेक्षा जास्त करणे,हे गंभीर आहे. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सोलापूर युवक प्रतिष्ठानचे राज सलगर यांनी केला आहे.
- अपघाताची मालिका सुरू असताना दुसरीकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यांनी तातडीने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन उपाययोजना करावी. कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अन्यथा पालकमंत्र्यांच्या अहमदनगर येथील घरासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा सोलापूर युवक प्रतिष्ठानचे राज सलगर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सुहास कदम यांनी दिला आहे.
- या पत्रकार परिषदेस युवक पॅंथर सामाजिक संघटनेचे अतिश बनसोडे, हॅप्पी युथ क्लबचे सोहन लोंढे, प्रशांत बाबर, मराठा क्रांती मोर्चाचे राम जाधव, प्रवीण कांबळे, शेखर बंगाळे, निशांत सावळे, युवक काँग्रेसचे शरद घुमटे, शोहेब चौधरी, सोमनाथ राऊत आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
No Result
View All Result