सोलापूर दिनांक –आज जग तिसऱ्या महायुद्धकडे वाटचाल करीत आहे. रशिया – युक्रेन, पॅलेस्टाईन – इस्राईल अशी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जागतिक शांतता उधळून लावण्यासाठी यामागे साम्राज्यवादी देश असल्याची टीका मास्तर यांनी केले.
आज पॅलेस्टाईन मध्ये शाळा, प्रार्थनास्थळे,दवाखाना,गोरगरिबांच्या घरावर बॉम्ब हल्ले करून उध्वस्त करत आहेत.पण पॅलेस्टाईन ची जनता ही लढाऊ आहेत.ते या हिंसाचाराचे इस्राईल प्रत्युत्तर देतील. आपण वैश्विक बंधुत्व जोपासतो. पॅलेस्टाईन च्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे म्हणत इस्राईलचा जाहीर निषेध व्यक्त केले.
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन च्या वतीने पॅलेस्टाईन वरील हल्ले थांबवा , महिला व बालकांवरील हत्या थांबवा,युद्ध मुक्त ची हाक देत वैश्विक बंधुभावाचक संदेश देत सिटू चे राज्य सचिव कॉ.युसुफ मेजर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा पार पडली.
यावेळी प्रसातविक करताना सिटू चे राज्य महासचिव ॲड एम.एच. शेख म्हणाले की, जागतिक शांतता आजची गरज आहे . पॅलेस्टाईन वर होणारे हल्ले हे साम्राज्यवादी हल्ले आहेत.ते रोखण्यासाठी पॅलेस्टाईन सर्वसामान्य जनते प्रति भातृभाव व्यक्त करूया असा संदेश दिले.
यावेळी मंचावर कॉ नसीमा शेख, कॉ सिद्धप्पा कलशेट्टी, कॉ व्यंकटेश कोंगारी, रंगप्पा मरेड्डी, कुरमया म्हेत्रे ॲड.अनिल वासम आदींची उपस्थिती होती.
सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन कॉ.ॲड अनिल वासम यांनी केले.