सोलापूर : बापूजी नगर येथील स्लेटर हाऊसजवळ ९ जून रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास पुन्हा एकदा दगड विटांचा मारा करून भीतीचे वातावरण निर्माण करण्यात आले . गणेश कयावाले, अरुण रजपूत , राहुल तुकुवाले आदी १२ ते १५ लोकांनी गल्लीत येऊन आरडाओरडा केला. तसेच गल्लीतील लोकांची दारे बडवून निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . ८ जून रोजी देखील याच ठिकाणी घरासमोर फरशी ठेवण्यावरून मारामारी झाली होती. याप्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोळंके तपास करीत आहेत.