आज (27 फेब्रुवारी) आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह व्यवहार करत असल्याचं पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारात चढ-उतार कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील संमिश्र परिस्थितीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली. सेन्सेक्स 59400 च्या खाली घसरला शिवाय निफ्टीही घसरण व्यवहार करत आहे. शेअर बाजारात आज सुरुवातीच्या सत्रात व्यवहार मंदावलेले दिसत आहेत. यामुळे जवळपास सर्व प्रमुख निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत आहेत.
आज शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह
शेअर बाजाराच्या आजच्या सुरुवातीच्या सत्रात बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक 132.62 अंकांनी म्हणजेच 0.22 टक्क्यांनी घसरून 59,331.31 वर उघडला. याशिवाय, एनएसई 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 37.20 अंकांच्या म्हणजेच 0.21 टक्क्यांच्या घसरणीसह 17,428.60 वर उघडला आहे.
सेन्सेक्स आणि निफ्टीची स्थिती काय?
सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी केवळ 12 शेअर्सच्या व्यवहारात तेजी दिसून येत आहे आणि 18 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. यासोबत, निफ्टीच्या 50 शेअर्स 11 शेअर्स तेजीत आहेत आणि 38 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. एक स्टॉक कायम स्थितीत आहे.