मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या 111 जणांच्या नियुक्तीला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे नेते आक्रमक झाले असून या उमेदवारांना नियुक्तीपत्रं मिळावीत यासाठी आंदोलन करण्यात आलं. आज या उमेदरवारांना नियुक्तीपत्रं देण्यात येणार होती.
या संबंधी मराठा क्रांती मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, जो पर्यंत 111 मराठा उमेदवारांना नियुक्तीपत्रं मिळत नाहीत, तोपर्यंत आम्ही हा कार्यक्रम होऊ देणार नाही. मराठा समाजावर हा अन्याय का केला जातोय असा सवालही त्यांनी विचारला. मराठा मोर्चा समन्वयक आणि शिंदे गटाचे प्रवक्ते संजीव भोर पाटील यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “1143 उमेदवारांना शिंदे सरकारने न्याय दिला. या नियुक्त्यांचे श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळू नये याबाबत कुणी राजकारण करतंय का हे शोधले पाहिजे. गेल्या सरकारच्या काळात या नियुक्त्या रखडल्या होत्या. एका उमेदवाराने आत्महत्या केली होती. तेव्हा कुणी आवाज उठवला नाही. शिंदे सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घेतलाय. पण आता यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे