सोलापूर – सोलापूर शहरामध्ये काही दिवसापासून बर्ड फ्लूच्या साथीने काही पक्षी मृत्यू झाल्याने व त्याचा आलेला रिपोर्ट आणि सोलापुरात घाबरलेली जनता या अनुषंगाने प्रशासनाने घेण्यात आलेल्या निर्णयामध्ये बंद करण्यात आलेल्या परिसरामध्ये विसंगती आहे लहान लहान व्यापाऱ्यांचे सर्व उद्योगधंदे बंद करण्यात आलेले आहेत आणि त्याच परिसरातील खाद्यपदार्थ विक्री करणारे दुकाने चालू आहेत लहान व्यापाऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे..
सरसकट सर्व दुकानांना उघडण्याचे परवानगी द्यावी अन्यथा सर्व दुकाने बंद करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांना देण्यात आले.यावेळी यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर ,लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, मनविसे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, शिक्षक सेना राज्य उपाध्यक्ष संतोष कुमार घोडके ,वाहतूक सेना जिल्हा संघटक प्रसाद कुमठेकर, शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर ,शिक्षक सेनेचे विश्वास गजभार, परिमल पुदाले, अभिषेक इरकल व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.