सोलापूर : राम सातपुते यांच्यासह बारा आमदारांचे एक वर्षासाठी झालेले निलंबन त्वरित रद्द करावे, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर शहर शाखेने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना बुधवार निवेदन दिले आहे. त्यावेळी भाजपचे शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष , महापौर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. आमदारांनी कोणतीही शिवीगाळ सभागृहात केलेली नाही हे सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून सिद्ध होत असताना केवळ सूड भावनेतून निलंबन करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.