जलशद्धीकरणाचे उपाय सुरू आहे – मा.आयुक्त शीतल तेली उगले
सोलापूर दिनांक – सोलापूर महानगरपालिका मार्फत सोलापूर शहरात व कुंभारी परिसरात असलेल्या कॉ. गोदुताई परुळेकर नगर येथे सुध्दा सध्या दुषित व पिवळसर पाणी पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत नागरिक प्रशासनाकडे विचारणा केली असता धरणाच्या परिसरात यंदा पाऊस कमी झाल्याने पाण्याचा तुटवडा असून नागरिकांना पाणी पुरवठा करणे इतके पाणी धरणात नाही. मृत जलाशय साठ्यातून पाणी पुरवठा होत आहे. ते पाणी पिण्यास योग्य असून गाळून अथवा उखाळून प्या असे सांगण्यात आले.
परंतु शहर व शहर हद्दवाढ भाग आणि कॉ.गोदुताई परुळेकर नगर परिसर भागात या दुषित व पिवळसर रंगाच्या पाण्यामुळे नागरिकांना सर्दी, खोखला, कावीळ, डालरिया, कॉलर, वात, गॅस्ट्रो, हिवताप, पोटदुखी, उलट्या, अतिसार असे जलजन्य आजार संभवत आहेत. वास्तविक पाहता नागरिकांना आपले जीवन सुरळीत व सुसज्ज जगण्यासाठी लागणारी साधने अपुरे आहेत. त्यात अशा प्रकारच्या आजारांना सामोरे जाण्याची आर्थिक व शारीरिक क्षमता नागरिकांकडे नाही. तसेच अशा आजारांच्या उपचारासाठी महागड्या दवाखान्यात जाणे परवडणारे नाही म्हणून शासकीय अथवा महापालिकेच्या दवाखान्यात नागरिक उपचारासाठी गेले असता तेथेही उपचाराची साधने, औषधे यांचा तुटवडा असल्याचे सांगण्यात येते. अर्थातच नागरिकांना आपले आरोग्य सांभाळणे मोठे आव्हानाचे काम झालेले आहे.
सबब सोलापूर महानगरपालिका मार्फत नागरिकांना योग्य पाणी पुरवठा करण्यासाठी नियोजन करणे, तांत्रिक अडचणी दूर करणे, पाण्याचा अपव्यय टाळणे, पाण्याची गळती थांबविणे, पाण्याची चोरी थांबविणे याकडे गांभीर्याने लक्ष घालून सध्या होत असलेल्या पाणी पुरवठा बाबत तातडीने स्वच्छ, पिण्यायोग्य आणि नियमित पाणीपुरवठा करण्यासंबंधी ठोस उपाययोजना करण्यात यावे व नागरिकांची शारीरिक, आर्थिक होत असलेले गैरसोय रोखून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली मा.आयुक्त सोलापूर महानगरपालिका शीतल तेली उगले यांना अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राज्य अध्यक्ष माजी नगरसेविका नसीमा शेख,जिल्हा अध्यक्ष शेवंता देशमुख, ॲड. अनिल वासम, सुनंदा बल्ला, लिंगव्वा सोलापूरे आदींच्या शिष्टमंडळ मार्फत निवेदन देण्यात आले.
त्यावर आयुक्त म्हणाले की, जलशुद्धीकरण प्रक्रिया चालू आहे.सदर पाणी पिण्यास योग्य असून शासकीय प्रयोगशाळेतून तपासणी केली आहे. नागरिकांनी याबाबत दक्ष राहावे असे आवाहन केले.
गंगुबाई कनकी, पद्मा दिकोंडा , ज्योती कर्रे, गीता म्याकल,वंदना कळसकर,शुभांगी कळसकर आदींसह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.