सोलापूर : श्री क्षेत्र पंढरपूर येथे माघवारी पालखी सोहळा 200 वर्षा पेक्षा जास्त कालावधी मध्ये चालू आहे. तसेच संस्कृतीक वारसा असलेला पारंपरिक कार्यक्रम आहे. अनेक अडचणीवर मात करून टिकवाला गेलेला सोहळा आहे. सध्या कोरोना संसर्गामुळे निर्बंध वाढले आहेत. पण रुग्ण संख्या कमी होत असलेने शाळा, महाविद्यालय, विवाह सोहळा, इ. सुरु करण्यात येत आहे. त्याप्रमाणे वारी परंपरा टिकवण्यासाठी 100 भाविकांना दिंडी मध्ये परवानगी देण्यात यावी. तसेच पालखी सोहळा, रिंगण सोहळा करण्यासाठी परवानगी दयावी. आणि दि.12 फेब्रुवारीला माघ एकादशी असून आरोग्य विभागाचे सर्व नियम व अटी पालन करण्याच्या शर्ती अटी नुसार परवानगी द्यावी. असे लेखी निवेदन अखिल भाविक वारकरी मंडळ सोलापूर शहर शिष्ट मंडळाने पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना देण्यात आले. या प्रसंगी पालकमंत्री म्हणाले की फेब्रुवारी मध्ये निर्बंध शिथिल होतील असे आत्ता तरी वाटत आहे.प्रशासना बरोबर चर्चा करून निर्णय घेऊ. यावेळी ह भ प संजय पवार (शहर अध्यक्ष ), ह भ प किसन बापू कापसे (शहर उपाध्यक्ष ),ह भ प विष्णू लिंबोळे (शहर उपाध्यक्ष ), ह भ प निवृत्ती मोरे(शहर कोशाध्यक्ष ),ह भ प गणेश वारे(शहर सह सचिव ), इ.पदाधिकारी उपस्थित होते.