येस न्युज मराठी नेटवर्क :राज्याच्या मंत्रीमंडळ निर्णय व शासन परिपत्रकानुसार राज्यातील विद्यार्थ्यांना ग्रेस गुणां सदर्भांत कार्यवाही चालू आहे. सदर निर्णयात राज्यातील खेळांडूना प्रोत्साहन मिळण्यासाठी व क्रीडा संस्कृतीचे जतन व संवर्धन होण्याच्यादृष्टीने फायदा व्हावी व खेळाडू यापासून वंचित न राहण्याची मागणी होत आहे.
२५ जानेवारी२०१९च्या संदर्भीय पारिपत्रकानुसार राज्यातील शालांत प्रमाणपत्र परिक्षेत प्रविष्ट झालेल्या शालेय खेळांडूसाठी खालील प्रमाणे अधिकचे सवलतीचे गुण देण्याची तरतूद आहे . स्पर्धा स्तर -प्राविण्यस्तर* जिल्हा ०५ गुण, विभागीयस्तर १० गुण, राज्यस्तर १५ गुण, राष्ट्रीय स्तर २० गुण ,आतंराष्ट्रीय स्तर २५ गुण . सहभागी खेळाडू गुण जिल्हास्तर :००गुण ,विभागीय स्तर ५ गुण,राज्यस्तरीय १२गुण, राष्ट्रीयस्तर २० गुण,आंतरराष्ट्रीय स्तर २५ गुण.
सदर परिपत्रकातील काही नियम अपवादात्मक परिस्थिती मुळे शिथील करणे आवश्यक झाले आहे कारण प्रचलित नियमात इयत्ता सहावी ते नववी पर्यंत शिकत असलेल्या शालेय खेळाडूंना स्पर्धतील सहभागा घेतल्याबद्दल ग्रेस गुण देण्याची तरतूद आहे .परंतू त्या खेळाडुस इयत्ता दहावी व बारावीमध्ये खेळणे अनिर्वाय आहे. यावर्षी कोविड१९ च्या आपत्कालीन परिस्थितीमुळे संपुर्ण देशात शालेयस्तर क्रीडा स्पर्धी होऊ शकल्या नाहीत. यामुळे चालू शैक्षणिक वर्षीतील इयत्ता दहावी व बारावीच्या वर्गात शिकत असलेल्या शालेय खेळाडूंना खेळाची क्षमता असून ही त्यांना खेळण्याची संधी मिळालेली नाही. अशा परिस्थितीमुळे चालू शैक्षणिक वर्षात दहावी व बारावी वर्गात असलेले खेळाडुंना स्पर्धेत खेळण्याची संधी मिळालेली नाही म्हणून खेळाडूंना यावर्षी गुण मिळण्यास पात्र असून ही, या ग्रेस गुणापासून वंचित राहणार आहेत . सदर परिस्थितीही अपवादात्मक आहे म्हणून या वर्षी शिकत असलेल्या दहावी व बारावीतील खेळाडूंना त्यांच्या यापूर्वीच्या इयत्तेचा विचार करुन क्रीडा स्पर्धोतील मिळविलेले पात्र गुणानुसार गुण मिळणे आवश्यक आहे.आजची परिस्थिती लक्षात घेऊन मागील शासनमान्य खेळ व क्रीडा प्रकार पाहून पात्र खेळाडूंना अधिकचे गुण द्यावे व याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी असे सोलापूर शहर व जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्यावतीने सर्व पदाधिका-यांनी केले आहे.
खेळाडूंना न्याय द्या
२०१९-२० या शैक्षणिक सत्रात कोरोनामुळे दहावीचा भूगोलाचा पेपर न घेता सरासरी गुणावरुन गुण देण्यात आले. मग खेळाडूंना याचा लाभ का मिळू नये ? इच्छा असताना देखील,खेळाडूंना कोरोनामुळे खेळता आले नाही यात खेळाडूंचा काय दोष. त्यामुळे खेळाडूंची मागील सत्रातील जिल्हा, विभाग, राज्य , राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी पाहून गुण दयावे.
विठ्ठल कुंभार – शहर अध्यक्ष , क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ
खेळ व खेळाडूंकडे दुर्लक्ष नको
चालू शैक्षणिक वर्षांमध्ये कोविडच्या महामारीमुळे राज्यात व देशात कोणत्याच प्रकारच्या स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे शासनाने खेळाडूंचे हित लक्षात घेऊन चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी व बारावीत शिकत असलेल्या सर्व खेळाडूंना ग्रेस गुणांची सवलत द्यावे. खेळाडू व खेळाकडे दुर्लक्ष करु नये.
दशरथ गुरव.. जिल्हा अध्यक्ष क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ.