सोलापूर : महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून भिम प्रतिष्ठान मागील 22 वर्षा पासून समाजासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहे. यावर्षीचा राज्यस्तरीय गौरव पुरस्कार कारंबा तालुका उत्तर सोलापूर लोकनियुक्त सरपंच कौशल्या विनायक सुतार यांना डॉक्टर सुनील गायकवाड, माजी खासदार लातूर व ज्ञानराज चौगुले आमदार उमरगा, बाळासाहेब वाघमारे जी एम ग्रुप संस्थापक, आनंद चंदनशिवे सोलापूर महानगरपालिका नगरसेवक, भीम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत बाबरे, भिम प्रतिष्ठान चे अध्यक्ष वीरेंद्र हिंगमिरे यांच्या शुभहस्ते कौशल्या सुतार विनायक सुतार यांनी राज्यस्तरीय गौरव पुरस्कार स्वीकारला