सोलापुरातील कुमठे माध्य. प्रशाला कुमठेचे प्रशाला कुमठेचे शिक्षक परमेश्वर कोळी यांना राज्यस्तरीय उत्कृष्ठ मराठी लेखन साहित्यसेवा व कार्यगौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. दि. २३ मार्च २०२५ रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित केलेल्या अहमदनगर जिल्हा श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे ३ रे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित केले होते .परमेश्वर कोळी यांनी केलेल्या उत्कृष्ठ कार्याची दखल घेऊन विधानसभा सदस्य श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले व ज्येष्ठ कवि कुसुमाग्रज यांच्या मानसकन्या रेखा भांडारे यांच्याहस्ते राज्यस्तरीय मराठी लेखन साहित्यसेवा व कार्यगौरव पुरस्काराने यथोचित सत्कार करण्यात आला.