सोलापूर- राज्य उत्पादन शुल्क,विभागाने मोठी कारवाई केली आहे.यामध्ये गोआ बनावटीच्या दारूचा साठा जप्त केला आहे.ही कारवाई सोलापूर या विभागांमार्फत 13 सप्टेंबर रोजी सोलापूर अक्कलकोट रोड सादुल पेट्रोल पंपासमोर जुना अक्कलकोट नाक्यासमोर रोडवर सोलापूर येथे केली आहे. अवैधरित्या विनापरवाना गोवा राज्य निर्मीत विदेशी दारू वाहतुक होणार असल्याचे खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून दुय्यम-निरीक्षक यु.व्ही.मिसाळ यांच्या पथकाने कारवाई केली आहे.
13 सप्टेंबर रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक गस्त घालत होते.एका खबऱ्याने खात्रीलायक माहिती दिली, अशोक लेलेंन्ड कंपनीचा चार चाकी टेम्पो ( MH १३- CU- ५४२७) या टेम्पोचा संशयनआल्याने वाहन थांबवले .सदर वाहनाची तपासणी केले असता टेम्पोमध्ये गोवा राज्य निर्मीतीच्या विदेशीनदारू इम्पेरियल ब्लुय व्हिस्की असलेले १८० मिलीच्या ४० बॉक्स, मॅकडॉल नं.१ रम १८० मिलीचे २ बॉक्सनआढळून आले.सदर वाहन मुद्देमालासह जप्त करून महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ नुसार गुन्हा नोंद करूननदोन आरोपीस अटक करण्यात आले आहे,
गोवाराज्य निर्मीत विदेशी मद्य इम्पेरियल ब्ल्यु व मॅकडॉल रम व व्हिस्की,एक अशोक लेलेंन्ड दोस्त कंपनीचा चार चाकी टेम्पो असा एकूण .7 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर नितीन धार्मिक , उप-अधीक्षक,
आदित्य पवार यांचे मार्गदर्शनाखाली यु.व्ही.मिसाळ, व विभागाचे सहा.दु.निरीक्षक,एस.एम.बिराजदार,जवान गजानन ढब्बे, किशोर लुंगसे ,रवि जगताप चेतन व्हनगुंटी इत्यादीनी सदर कारवाई पार पाडण्यास मदत केली.पुढील तपास उपनिरीक्षक यु.व्ही.मिसाळ हे करित आहेत.