सोलापूरचे नाव ऑलम्पिक मध्ये चमकेल मा.डॉ. सचिन ओंबासे
सोलापूर येथील शासकीय क्रीडांगण नेहरूनगर येथे १० वर्षाखालील व १३ वर्षाखालील राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचा आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना व सोलापूर जिल्हा धनुर्विद्या संघटना यांचे संयुक्त विद्यमाने शासकीय क्रीडांगण नेहरूनगर या ठिकाणी या स्पर्धा चार दिवस चालणार आहेत.
आज पहिल्या दिवशी या स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे साहेब यांनी केले. यावेळी अध्यक्षस्थानी महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे उपाध्यक्ष हरिदास रणदिवे होते. प्रमुख पाहुणे महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदूरकर, सहसचिव सोनल बुंदेले, तुळजापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू अजिंक्य रणदिवे, वास्तुविशारद अमर नागमोडे, क्रीडा अधिकारी म्हणून निवड झालेले विठ्ठल भालेराव सर या ठिकाणी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना डॉ. सचिन ओंबासे म्हणाले की सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्चरी वाढते आहे. आणि महाराष्ट्रातील एवढे खेळाडू गडचिरोली पासून ते पार रत्नागिरी पर्यंत आलेले सगळे खेळाडू अगदी सहा वर्षापासून ते दहा वर्षापर्यंतचे चांगले क्रीडा नैपुण्य या ठिकाणी दाखवित आहेत. यांचे कौशल्य बघून नक्की वाटते की येणाऱ्या काळामध्ये भारताचे नाव ऑलिंपिकच्या पथकावर कोरले जाईल.
यावेळी बोलताना हरिदास रणदिवे आणि सांगितले की शाळेच्या सर्व स्तरांवरती क्रीडा हा विषय महत्त्वाचा विषय प्रमुख विषय कंपल्सरी विषय म्हणून समाविष्ट झाला पाहिजे आणि त्याचं गुणदान टक्केवारी मध्ये आलं पाहिजे. तर खऱ्या अर्थाने या क्रीडाची बीजे विद्यार्थी दशेपासूनच रोवली जातील. यावेळी प्रमोद चांदूरकर सरांनी सांगितलं की देशाच्या टीम मध्ये 70% महाराष्ट्राचे खेळाडू आहेत हे महाराष्ट्रातल्या पालकांचे क्रीडा मार्गदर्शकांचे, सर्व जिल्हा संघटनांचे यश आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रभरातून जवळपास साडेसातशे पेक्षा अधिक खेळाडू चार दिवस या ठिकाणी नेहरूनगर इथं आपल्या क्रीडा कौशल्याचं प्रदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावता घाडगे यांनी केले याप्रसंगी क्रीडा अधिकारी म्हणून ज्यांची नुकतीच निवड झाली असे विठ्ठल भालेराव सर यांचा सत्कार डॉ. सचिन ओंबासे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सर्व पालकांनी, खेळाडूंनी, क्रीडा मार्गदर्शकांनी आणि ऑफिशिअल्सने जे सहकार्य केलं त्याबद्दल सर्व टीमच्या वतीने या सर्वांचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करण्यात आले. आज गुरुवारी इंडियन राऊंडच्या स्पर्धा संपन्न झाल्या. शुक्रवारी रिकर्व्ह आणि कपाऊंड राऊंडच्या स्पर्धा होणार आहेत.

