बार्शी, ता.२१: बार्शी तालुक्यातील, मालवंडी येथील श्री शेखागौरी यात्रेस गुरवारपासून प्ररंभ होत आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील पारंपरिक व सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ‘मालवंडी यात्रा कमिटी’ च्या वतीने देण्यात आली.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘श्री शेखागौरी’ यात्रेनिमित्त गुरवार (ता .२३) मे रात्री संदल व ताफे जंगी मुकाबला , लाईट डेकोरेशन, शोभेचे दारूकाम, धुमाकूळ म्युझिकल नाईट बारामती सोबत लावण्या व बतावण्यांचा व्हरायटी शो. शुक्रवार (ता.२४) रात्री सात वाजल्यापासून पारंपरिक सोंगाचा कार्यक्रम, बॅंड’ चा जंगी मुकाबला, शोभेचे दारूकाम, इश्वर बापू पिंपरीकर लोकनाट्य तमाशा, बारामती, बारा गावच्या बारा अप्सरा व लावण्या चंद्रा यांचा दुरंगी सामना रंगणार आहे. यात्रेची सांगता शनिवार (ता.२५) रोजी होणार असून सकाळी दहा वाजता कलगीतुरा, लोकगीते व धनगर ओव्या, दुपारी दोन वाजल्यापासून जंगी कुस्त्यांचा फड सुरू होणार आहे. रात्री मंगला बनसोडे यांचा लोकनाट्या तमाशा होईल. शोभेचे दारूकाम सुरू असताना जवळ कोणीही जाऊ नये, बॅंडमध्ये डान्स करू नये, लाईटच्या खांबास हात लावू नये अशा सुचना ‘यात्रा कमिटी’ च्या वतीने करण्यात आल्या आहेत.