मुंबईसाठी आठवड्यातून चार उड्डाणे, प्रारंभीचे भाडे फक्त ₹3,999 पासून
बंगळुरू, 29 सप्टेंबर 2025: संजय घोडावत ग्रुपची विमान वाहतूक शाखा असलेल्या स्टार एअरने सोलापूर–मुंबई थेट उड्डाणांची घोषणा केली असून, यामुळे सोलापूर हे त्यांच्या वाढत्या हवाई वहातुक सेवेचे 31वे स्थानक ठरणार आहे. ही सेवा 15 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणार असून, सेवेचे सर्व करांसह प्रारंभीचे भाडे फक्त ₹3,999 इतके असेल.
या हवाई सेवेचे पहिले उड्डाण 15 ऑक्टोबर 2025 (बुधवार) रोजी मुंबई विमानतळा वरुण होणार असुन त्याचे उदघाटन माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
ही सेवा महाराष्ट्र राज्याच्या प्रादेशिक संपर्क योजनेअंतर्गत आठवड्यातून चार दिवस — मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार — उपलब्ध असेल. या मार्गामुळे व्यावसायिक तसेच पर्यटकां साठी अधिक सोयीस्कर होणार असून, प्रादेशिक आर्थिक विकासालाही या मुळे चालना मिळेल.
• फ्लाइट S5 333: मुंबईहून दुपारी 12:50 ला सुटेल, सोलापूरला 14:10 ला पोहोचेल
• फ्लाइट S5 334: सोलापूरहून 14:40 ला सुटेल, मुंबईला 15:45 ला पोहोचेल
स्टार एअरच्या चीफ कमर्शियल अँड मार्केटिंग ऑफिसर सौ. शिल्पा भाटिया म्हणाल्या की “सोलापूरला आमच्या वाढत्या नेटवर्क मध्ये सामील करण्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. महाराष्ट्र सरकारच्या प्रादेशिक हवाई संपर्क योजनेस मिळालेल्या ठोस पाठिंब्यामुळे हे मार्ग शक्य झाले आहे.
त्या पुढे म्हणाल्या की “सोलापूर हे उद्योग, शिक्षण व संस्कृतीचे केंद्र असून या नव्या सेवेमुळे प्रवासाचा वेळ कमी होईल, तसेच मुंबईशी व्यापारी व पर्यटन क्षेत्रातील संबंध अधिक दृढ होतील.
या नव्या जोडणीनंतर स्टार एअर आपले प्रादेशिक विमान वाहतुकिचे जाळे अधिक विस्तारत असून प्रवाशांना आरामदायी आणि सहज प्रवासाचा अनुभव देत आहे. तिकिटे आता एअरलाइन वेबसाइट आणि ट्रॅव्हल पार्टनर्सद्वारे विक्रीसाठी खुली आहेत.