सोलापूर : एसटी स्टँड वर शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शुकशुकाट दिसत होता. तुरळक एसटी बसेस स्थानकामध्ये बाहेर गावाहून येत असल्याचे दिसून आले. एसटी स्थानकामध्ये कंडक्टर व चालक येऊन थांबले होते. मात्र प्रवासी संख्या खूपच कमी असल्यामुळे त्यांना वाहतूक नियंत्रक एसटी बस घेऊन जाण्याची परवानगी देत नव्हते .किमान ४० प्रवासी जमा झाल्यानंतर आम्ही एसटी बसेस सोडत असल्याचे प्रभारी वाहतूक नियंत्रक आत्तार यांनी सांगितले .दुसरे प्रभारी वाहतूक नियंत्रक श्रीराम रामदासी यांनी सांगितले की, वीकेंड लॉकडावूनमुळे प्रवासी संख्या खूपच घटली आहे .आमच्याकडे एसटी पुरेशा उपलब्ध आहेत .त्याच प्रमाणे वाहक व चालक देखील कामावर हजर आहेत. मात्र प्रवासी खूपच कमी असल्यामुळे आज 25% एसटी सोडण्यात येत आहेत.