आमच्या वैदिक पुरोहित वर्गाचे हिताच्या उद्देशाने आमच्या मंडळाचे स्थापना करण्यात आली आहे. आम्ही या मंडळाच्या माध्यमातून वैदिक पूजापाठ शिबीर, शनिप्रदोष कार्यक्रम, रुद्रयाग, गिरजा कल्याणमहोत्सव, कोरोना काळात गरजूंना अन्न वाटप. मंडळाचे कॅलेंडर २०२३ सालाचे वृक्षारोपण, व समाजातील समाजिक धार्मिक कार्य करणारे व कर्तुत्ववान व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करणे असे विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.
यंदाच्या वर्षी आम्ही वास्तु ज्योतिष शास्त्र या विषयासंदर्भात तज्ञ असे श्री वे कल्याण स्वामी सर व श्री डॉक्टर विनोद कोल्हापुरे सर यांचे व्याख्यान ठेवले आहे सदर व्याख्यानात वास्तुज्योतिष शास्त्र बाबत बेसिक माहिती व वास्तू ज्योतिष शास्त्र याबाबत मार्गदर्शन लाभणार आहे. तरी या होणान्या वास्तु ज्योतिष शास्त्र शिबिरात वास्तू बाबत दैनंदिन जीवनातील भेडसावणाऱ्या शंकबाबत शंका निरसन होणार आहे म्हणून पुरोहित वर्ग व बांधकाम क्षेत्रातील संलग्नित असलेले व्यक्ती • आर्किटेक्ट सिव्हिल इंजिनिअर या विषयाबद्दल ज्यांना की या वास्तुज्योतिष शास्त्र बद्दल काही जाणून घ्यायची इच्छा आहे अशा व्यक्तीनी जास्तीत जास्त जणांनी या शिबिरामध्ये सहभागी होऊन शिबिराचा फायदा घ्यावे. सदर शिबिराचे उद्घाटन काशी पिठाचे जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभहस्ते व मैदर्गी चे श्री १०८ ष. ब्र. नीलकंठ शिवाचार्य स्वामीजी यांचे आणि शहर उत्तरचे आमदार व माजी पालकमंत्री माननीय श्री विजयकुमारजी देशमुख मालक. सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ माननीय श्री दिलीप स्वामी साहेब वादानी प्रतिष्ठानचे माननीय श्री उदयशंकरजी-आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शिवस्मारक नवी पेठ सोलापूर येथे संपन्न होणार आहे.
सदर शिबिरामध्ये सकाळचा सत्रात चहा व नाश्ता आणि दुपारी जेवण आणि सायंकाळी चहा व महत्त्वाचे नोट्स, पॅड, पेन, आयडी व याप्रमाणे सर्व शिबिरार्थींना दिले जाणार आहे. शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी शुल्क भरून नाव नोंदणी करणे आवश्यक आहे नोंदणी सीमित असल्याने लवकरात लवकर आपले नाव नोंदवून घ्यावे.
नोंदणीसाठी पुढील नंबर वर संपर्क साधावे ८४२१८९१००८, ९४२१०७५०४७, ९८५०१६६३२७, ९९६०९६०९५१