सोलापूर – बोधी वृक्ष फाउंडेशन सोलापूर, महाकारुणिक एज्युकेशनल फाउंडेशन व मूलनिवासी सभ्यता संघ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 2589 व्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त जिल्हास्तरीय भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत शहरातील व जिल्ह्यातील एकूण 175 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ही स्पर्धा तीन विभागातून घेण्यात आली लहान गटामध्ये प्रथम क्रमांक प्रार्थना सोमशेखर आळंद हिचा आला, द्वितीय क्रमांक मयूर सुनील कर्डिले व तृतीय क्रमांक एकरा सरफराज शेख हीचा आला. मोठ्या गटातून सार्थकी बालकिसन चिलबेरी हिचा प्रथम क्रमांक, कोमल जयसिंग यनमूल हिचा द्वितीय क्रमांक तर आचल गणेश मार्गम् हिचा तृतीय क्रमांक आला.
खुल्या गटामधून शितल आदमाने हिचा प्रथम क्रमांक, प्रसाद अबुटे याचा द्वितीय क्रमांक, तर विजय मंगलुरे याचा तृतीय क्रमांक आला. खुल्या गटातील प्रथम क्रमांक विजेत्याने अजिंठा येथील बोधिसत्व या चित्राने सर्वांचे लक्ष वेधले. विजेत्यांना बक्षीस रूपाने साहित्याचे वाटप ,प्रमाणपत्र व सन्मानचिन्हाने गौरविण्यात आले बाकीच्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून रामचंद्र हक्के, डॉ.सुहास सरवदे , मीनाक्षी रामपुरे यांनी पारदर्शकपणे विजेत्यांना न्याय दिला. याप्रसंगी तीनही संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये डॉक्टर औदुंबर मस्के , अभियंता राजेश जगताप, संजय आबुटे ,उमाकांत राजगुरू ,राहुल बाबरे, स्मिता आबुटे, सुनिता गायकवाड ,डॉक्टर रेखा ओहोळ, शारदाताई गजभिये, संघप्रकाश दुडे, आशा क्षीरसागर, सुहासिनी देवनवर ,अमोल देवनवर यांची कार्यक्रमास उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल वाघमारे, मारुती बेलभंडारे ,ऍड. पवन भालेदार, अभिषेक सरवदे, सुशांत निकंबे ,दीपंकर माने यांनी योगदान दिले.या स्पर्धेसाठी संडे धम्म स्कूलच्या तीनही शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संडे धम्म स्कूलच्या संचालिका स्मिता आबुटे, दिनेश गायकवाड ,अजय मोरे यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा वाघमारे यांनी केले कार्यक्रमाचि प्रस्तावना डॉ.औदुंबर मस्के यांनी केली. तर आभार उमाकांत राजगुरू यांनी केले