सोलापूर : एस पी पॉलिटेक्निक, कुमठे येथे राज्यस्तरीय “टेक्नोवेव 2025” या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरण समारंभ नुकताच दिमाखात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त रवी पवार उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रमुख विश्वस्त श्री. जयकुमार माने होते, विश्वस्त स्वाती माने, प्राचार्या रोहिणी चव्हाण, प्रा सुनील मिश्रा, जयसिंग गायकवाड, श्री गुंगे आदींची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदनेने झाली याप्रसंगी कु शिवरानी संदुपटला हिने नृत्य सादर केले. त्याबरोबरच मान्यवरांच्या हस्ते स्व. ब्राह्मदेवदादा माने यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.
यावेळी प्राचार्या रोहिणी चव्हाण यांनी स्पर्धेच्या उद्देशाचे महत्त्व स्पष्ट करत तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील नवकल्पनांच्या गरजेवर भर दिला.
प्रमुख पाहुणे श्री रवी पवार यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी नवनवीन कौशल्य आत्मसात करावी असे आवाहन केले. कृतिम बुद्धिमत्ता ही. मानवासमोरील आव्हान नसून ती एक संधी आहे असे सांगितले. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची कास धरावी असेही प्रतिपादित केले.
तर प्रमुख विश्वस्त जयकुमार माने यांनी विद्यार्थ्यांनी नवनव्या संकल्पना स्वीकारून त्याचा सातत्याने पाठलाग करावा असे आवाहन केले. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून संस्था सतत सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करेल असेही अस्वस्थ केले.
प्रा. सुनील मिश्रा यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी सॉफ्ट स्किल्स किती महत्त्वाचे आहे हे स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकासात सॉफ्ट स्किल्सचे महत्त्व सांगितले.
याप्रसंगी संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय “इनोव्हेटिव्ह टीपीओ 2025” अवॉर्ड प्राप्त प्रा ज्ञानेश्वर जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
तर प्रसाद पवार या अंतिम वर्षातील संगणक विभागाचा “अष्टपैलू खेळाडू” म्हणून रोख दहा हजार रुपये व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला
टेक्नो वेबस स्पर्धेतील विजेते खालील प्रमाणे
“टेक्नोवेव 2025” अंतर्गत पेपर प्रेझेंटेशन, टेक्निकल क्विझ, रोबो रेस आणि पोस्टर प्रेझेंटेशन या विविध तांत्रिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रभरातील नामांकित पॉलिटेक्निक संस्थांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. परीक्षकांनी विद्यार्थ्यांचे सखोल मूल्यमापन करून विजेत्यांची निवड केली.
विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्रे व पारितोषिके प्रदान करण्यात आली. विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे—
स्टेट लेव्हल टेक्निकल पेपर प्रेझेंटेशन विजेते
➤ मेकॅनिकल विभाग 🏆 प्रथम क्रमांक:वसंत कुमार आणि सनी कुमार (ए. जी. पाटील पॉलिटेक्निक) 🥈 द्वितीय क्रमांक: वीरेंद्र पंचाक्षरी आणि ओंकार स्वामी (एस पी एम पॉलिटेक्निक) 🥉तृतीय क्रमांक: तेजस्विनी जोगदंड आणि मनीषा बनसोडे (एस ई एस पॉलिटेक्निक)
➤ कॉम्प्युटर विभाग 🏆 प्रथम क्रमांक:शिफा अश्फाक शेख आणि शोभा श्रीरंग बिरादार (ए जी पाटील पॉलिटेक्निक) 🥈 द्वितीय क्रमांक:कुंजल मचाले आणि मृणालिनी भडंगे (SSWP सोलापूर) तृतीय क्रमांक:शिवानी माळवे आणि वैभवी हुमनाबादकर (ए. जी. पाटील पॉलिटेक्निक)
➤ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभाग 🏆 प्रथम क्रमांक: प्राची सतीश वांगी आणि स्नेहा अजय जाधव (ए. जी. पाटील पॉलिटेक्निक) 🥈 द्वितीय क्रमांक:हर्षवर्धन गरड आणि समर्थ माने (SPM पॉलिटेक्निक) 🥉 तृतीय क्रमांक:संजना गुजरे आणि प्रतीक्षा रोटे (SSWP सोलापूर)
स्टेट लेव्हल टेक्निकल क्विझ विजेते
➤ मेकॅनिकल विभाग 🏆 प्रथम क्रमांक: शोएब रशीद मुल्ला आणि समर्थ नागनाथ सलगर (SPM पॉलिटेक्निक) 🥈 द्वितीय क्रमांक:राजू मशाक पठाण आणि स्वप्निल राजेंद्र शिंदे (BMP पॉलिटेक्निक) 🥉 तृतीय क्रमांक:स्वप्निल कोपुल आणि चरण मामडी (SPM पॉलिटेक्निक)
➤ कॉम्प्युटर विभाग 🏆 प्रथम क्रमांक:युवराज गंधमल आणि यशोधन चव्हाण (GP सोलापूर) 🥈द्वितीय क्रमांक: योगिता हूले आणि अल्तमास अमरीन बागवान (SVSMD अक्कलकोट) 🥉 तृतीय क्रमांक: आरती गाडेकर आणि विद्या बारोकर (SSWP सोलापूर)
➤ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभाग 🏆 प्रथम क्रमांक: सुमित उमाकांत बरबडे आणि वैष्णवी राठोड (SPM पॉलिटेक्निक) 🥈द्वितीय क्रमांक:प्राची पलंगे आणि सना सय्यद (ए. जी. पाटील पॉलिटेक्निक) 🥉 तृतीय क्रमांक: स्नेहा जाधव आणि पृथ्वी तिवारी (ए. जी. पाटील पॉलिटेक्निक)
स्टेट लेव्हल पोस्टर प्रेझेंटेशन विजेते
🏆 प्रथम क्रमांक:पूजा थंब आणि शोभना बिरादार (ए. जी. पाटील पॉलिटेक्निक) 🥈 द्वितीय क्रमांक:आश्लेषा गाडेकर आणि आलिशा शेख (SES पॉलिटेक्निक) 🥉 तृतीय क्रमांक:भाग्यलक्ष्मी कुरापाटी आणि आरती बिराजदार (SPM पॉलिटेक्निक)
स्टेट लेव्हल रोबो रेस विजेते
🏆 प्रथम क्रमांक:हर्षवर्धनसिंग रजपूत आणि आदित्य कानडे (SPM पॉलिटेक्निक) 🥈 द्वितीय क्रमांक:आदित्य खानोरे आणि आदित्य हुंडेकर (ए. जी. पाटील पॉलिटेक्निक) 🥉 तृतीय क्रमांक:संकेत दोडतले आणि समर्थ रुपनुरे (SPM पॉलिटेक्निक)
स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी खालील विभागीय समन्वयकांनी विशेष मेहनत घेतली—
✅ पेपर प्रेझेंटेशन समन्वयक: ▪️ मेकॅनिकल विभाग – श्री. मयूर ननवरे ▪️ कॉम्प्युटर विभाग – सौ. अंजली आसादे ▪️ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभाग – कुमारी वैष्णवी चिवडशेट्टी
✅ टेक्निकल क्विझ समन्वयक: ▪️ मेकॅनिकल विभाग – श्री. नियामत मुल्ला ▪️ कॉम्प्युटर विभाग – कु. अनुराधा बिराजदार ▪️ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभाग – कु मिताली कवडे
✅ पोस्टर प्रेझेंटेशन समन्वयक: ▪️ कुमारी सविता म्हेत्रे
✅ रोबो रेस समन्वयक: ▪️ शाहिद शेख
सदर टेक्नोवेव 2025 यशस्वी करण्यासाठी मुख्य समन्वयक प्रा श्रीकांत चिक्का तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख प्रा. मलेशी बगले, प्रा. अनंत चौधरी, प्रा. विवेक राशिनकर, प्रा. गिरीजा दीक्षित, प्रा. अतुल पत्की आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सविता म्हेत्रे व प्रा. ज्ञानेश्वर जाधव तर आभार प्रा श्रीकांत चिक्का यांनी मानले