सोलापूर – येथील आध्यात्मिक विषयांवरील लेखिका श्रीमती अनिता अरविंद लिमये (वय ७५) यांचे बुधवारी पहाटे अल्प आजाराने निधन झाले.
स्वरचित भाव भक्तीगीत गायनाचा विविध मठ मंदिरात त्या नेहमीच कार्यक्रम करीत असत. सोलापूरसह राज्यातील विविध वृत्तपत्रे, मासिके, दिवाळीसह विशेषांकात त्या नेहमीच आध्यात्मिक विषयावर लेखन करीत असत. “भीमरुपी महारुद्रा” या त्यांच्या पुस्तकास छान वाचकाश्रय लाभला आहे.
श्रीमती लिमये यांच्या पश्च्यात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. मधला मारुती परिसरातील लिमये मेडिकल्सचे मालक आशुतोष लिमये यांच्या त्या मातोश्री होत.