सोलापूर । भंडारकवठे येथील वै. ह-भ-प अनंतराव रामचंद्र कुलकर्णी यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त सोलापूर जिल्ह्याच्या अध्यात्मिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे श्री ह.भ.प पुरुषोत्तम रामचंद्र कुमठेकर यांना सन्मानचिन्ह, मानपत्र, मानधन देऊन अध्यात्म पुरस्काराने गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आप्पासाहेब बबलेश्वर सावकार ह-भ-प संजय पाटील यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार देण्यात आला. या प्रसंगी सौ.पद्मजा कुमठेकर, सौ.राधिका कुमठेकर, सदाशिव चवरे (सर), विलास कोकितकर, हरिप्रसाद धर्माधिकारी,जोगी पेठकर , गोपीकिशन कुमठेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात श्री विट्ठल मूर्तीची पुजा व दीप प्रज्वलन करुन झाली . कार्यक्रमाची प्रस्थावना नारायण कुलकर्णी यांनी केली. हरिप्रसाद धर्माधिकारी व सदाशिव चवरे (सर)यांनी आपल्या प्रवचन शैलीने पुरषोत्तम कुमठेकर महाराजांचा गौरव केला.
सत्कारमूर्ती कुमठेकर महाराजांनी आपल्या सुमधूर आवाजाने अभंग गावून गावाचे वातावरण भक्तिमय केले तर कु.धनश्री कुमठेकर यांनी गवळण गाऊन सर्वांचे मन मोहुन टाकले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण कुलकर्णी यांनी केले तर सर्व ग्रामस्थांच्या वतीने आभार प्रदर्शन मधुसूदन कुलकर्णी यांनी केले.