संपूर्ण भारतात पहिल्यांदाच अशा सामन्यांचे आयोजन
सोलापूर : 95 एफ एम आणि इल्यूझियम क्लब यांच्यावतीने सोलापुरात पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या साडी प्रीमियर लीग मध्ये SPICE n ICE च्या पैठणी पॅन्थर्स संघाने विजेत्याचा मान मिळवला तर हॉटेल सागर सुपर शायनर हा संघ उपविजेता ठरला. विजेत्यांना प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. दमाणी नगरातील मैदानावर मंगळवार आणि बुधवारी या स्पर्धा झाल्या यात नऊ संघ सहभागी झाले होते ;सहा सहा संघातून आणि चार चार मधून दोन संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले होते. विजेत्या संघाला रोख 21000 रुपयांचे आणि उपविजेत्या संघाला रोख 11000 रुपयांचे बक्षीस मिळाले. प्रत्येक खेळाडूस सहभाग प्रमाणपत्र आणि मेडल प्रदान करण्यात आले.
या साडी प्रीमियर लीग साठी हिलिंग अँड फिजिओथेरपी सेंटर, हॉटेल ओरिएंट लाईट, आदर्श सुझुकी,स्पाईस एन आईस इव्हेंट्स, हॉटेल जय पॅलेस इन, हॉटेल गंगा रीजन्सी, हॉटेल अजिंक्य, हॉटेल सागा, इल्यूझियम क्लब हे टीम ओनर्स होते. असोसिएट पार्टनर बझ लाउंज अँड गार्डन रेस्टॉरंट बाय हॉटेल प्रथम, यशोधरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांचे सहकार्य मिळाले.
विजेत्या टीमच्या मुली चक्क नऊवारी साडी नेसून आणि फेटे बांधून क्रिकेट खेळल्या. आपली संस्कृती आणि खेळ या दोन्हींची सांगड घालून खेळ प्रदर्शित करण्याचा हा पहिलाच प्रसंग असावा. डॉ. सुहासिनी शहा आणि उपस्थित सगळ्यांनीच विजेत्या टीमचं मनापासून कौतुक केलं.